Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

पत्रपेटीत दडून बसला सापाच्या रूपात विषारी पाहुणा


Main News

क्वीसलँड, दि. २८ (पीसीबी) - घराबाहेर ठेवलेली पत्रपेटी आतुरतेने उघडायला गेलात आणि त्या एक भलामोठा अजगर आराम करताना दिसला तर? ऐकूनच घाम फुटला ना? सा काहीसा प्रसंग क्वीसलँडमधील एका तरुणावर आला. आपल्या घराबाहेर ठेवण्यात आलेली पत्रपेटी मॅक्स उघडायला गेला पण ही पेटी उघडताच त्याला धक्का बसला. कारण यामध्ये अजगर निवांतपणे आराम करत होता.

 

क्वीसलँडमधील मॅक्स या तरुणाच्या घराबाहेर बसवण्यात आलेल्या पत्रपेटीत त्याला अजगर सापडला. ख्रिसमससाठी आपल्याला आलेली शुभेच्छा पत्र काढण्यासाठी मॅक्सने आपल्या घराबाहेर बसवण्यात आलेली पत्रपेटी उघडली. तर त्यात चक्क लांबलचक अजगर आराम करत होता. त्यामुळे घाबरून मॅक्सने सर्पमित्रांना फोन केला.

 

काही वेळातच सर्पमित्र तिथे आले. पण हा अजगर काही केल्या बाहेर येईना. या अजगराला आपले नवीन घर इतके आवडले की त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणा-या सर्पमित्रावर त्याने हल्ला करायलाही मागे पुढे पाहिले नाही

 

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातल्या एका महिलेच्या घरात देखील असाच प्रकार घडला होता. तिच्या घरातील ख्रिसमस ट्रीवर विषारी साप वेटोळे देऊन बसला होता. शेवटी सर्पमित्रांच्या मदतीने तिने या विषारी पाहुण्याला घरातून बाहेर हाकलवून दिले होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin