Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

बांगलादेशात हल्ल्याचा कट रचणाऱ्या संशयितांना अटक


Main News

ढाका, दि. २८ (पीसीबी) - बांगलादेशमध्ये नववर्षाच्या जल्लोषादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या ५ संशयितांना अटक केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या पोलीस प्रमुखांनी दिली आहे. हे संशयित जमात- उल- मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या ५ संशयित दहशतवाद्यांना काही दिवसांपूर्वी जुलै महिन्यात ढाका येथे झालेल्या कॅफे हल्ल्यातही दोषी ठरवण्यात आले आहे.
 
ढाका येथे कॅफेमध्ये झालेल्या हल्ल्यात त्यावेळी २२ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र आता तेच दहशतवादी नववर्षात पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याचे दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस प्रमुख मोनिरुल इस्लाम यांनी सांगितले आहे.
 
पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांकडून ६० किलोची स्फोटके जप्त केली आहेत. ढाकामध्ये पोलिसांनी रात्रभर घातलेल्या छाप्यात या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ३१ डिसेंबरच्या संध्याकाळपासून १ जानेवारी २०१७ पर्यंत बाहेर कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin