Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


एअर इंडियाच्या विमानांमध्ये महिलांसाठी राखीव आसने


Main News

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - भारताची राष्ट्रीय हवाई कंपनी एअर इंडियाच्या विमानांमध्ये महिलांसाठी राखीव आसने ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १८ जानेवारीपासून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या विमानांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती एअर इंडियाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक अश्वानि लोहानी यांनी दिली. याबाबत माहिती देताना लोहानी म्हणाले की, जगात पहिल्यांदाच अशाप्रकारे विमानांमध्ये महिलांसाठी आसने राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विमानाच्या पुढच्या भागातील दोन रांगा किंवा सहा आसने आरक्षित करण्यात येणार आहेत. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. एअर इंडियाच्या विमानांमध्ये देण्यात येणारे हे आरक्षण इकॉनॉमी क्लासपुरते मर्यादित असेल. सध्या अनेक महिला विमानाने एकट्याने प्रवास करतात. त्यामुळे महिला प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षितरीत्या प्रवास करता यावा, यासाठी हा घेण्यात आल्याचे लोहानी यांनी सांगितले.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin