Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


मोफत पाठ्यपुस्तकांची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या खात्यावर होणार जमा


Main News

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. यापुढे विद्यार्थ्यांना थेट पुस्तके देण्याऐवजी त्यासाठीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रीयीकृत बॅंकेमध्ये झीरो बॅलन्स खाती उघडण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने ५ डिसेंबर रोजी आदेश काढून विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तू स्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर, रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले आहे. त्या खात्याला संबंधित लाभार्थ्यांचा आधार क्रमांक जोडण्यासही सांगितले आहे. त्यानुसार कल्याणकारी योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांचे बॅंकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील सगळ्याच विद्यार्थ्यांची बॅंकेमध्ये खाती नाहीत. शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ त्यांना देण्यापूर्वी त्यांची खाती बॅंकेमध्ये असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin