Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


आता ४० दिवस फक्त “निवडणूक एके निवडणूक”


Main News

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (दि. १०) दुपारी महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केल्यानंतर आता महापालिका भवन मुख्यालयात शुकशुकाट पसरला आहे. एरवी नगरसेवकांची महापालिकेत असणारी वर्दळ तर थांबलीच आहे. शिवाय अधिकारीही बैठकीत व्यस्त असल्याने लोकांना रिकाम्या हातानेच परतावे लागणार आहे. महापालिका निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यासाठी आदर्श आचारसंहिता जाहीर झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते, नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि मतदारांनाही या निवडणुकीची प्रतीक्षा होती. नगरसेवकांनी तर महासभेलाही येणे बंद केले होते. महापालिकेत ९२ नगरसेवकांचे संख्याबळ असूनही सत्ताधारी राष्ट्रवादीला गणसंख्येअभावी अखेरच्या तीन महासभा तहकूब कराव्या लागल्या. त्यामुळे महासभेत फार मोठे धोरणात्मक निर्णय झाले नव्हते. पीएमपीला बसखरेदीसाठी आवश्यक रक्कम देण्याचा प्रस्ताव त्यास अपवाद ठरला. आता मतदानासाठी अवघे ४० दिवस बाकी असून, पुढील ४० दिवस महापालिकेला कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. महापालिकेची अत्यावश्यक कामे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मंजूर करता येतील. दरम्यान, ठेकेदारांची नेहमीप्रमाणे महापालिकेत असलेली वर्दळही थांबणार असून, आता महापालिकेतील नवीन सत्ता स्थापनेनंतर मोठ्या कामांसाठी प्रक्रिया सुर होईल. तोपर्यंत जुन्या कामांसंदर्भातील देयकांसाठीच ठेकेदारांची महापालिकेत गर्दी राहणार आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin