Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


बीएसएफनंतर सीआरपीएफच्या जवानाचा व्हिडीओ; सुविधा मिऴत नसल्याची मांडली व्यथा


Main News

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - सीमा सुरक्षा दलाचे जवान तेजबहादूर यादव यांनी निकृष्ट दर्जाच्या अन्नाची आणि असुविधाची व्यथा मांडणारा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आता केंद्रीय राखीव पोलीस(सीआरपीएफ) दलाच्या जवानाने फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. माऊंट अबूमध्ये तैनात असणाऱ्या २६ वर्षीय जीत सिंह यांनी लष्कर आणि सीआरपीएफला मिळणाऱ्या सोयी सुविधांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सीआरपीएफकडून लष्काराइतकीच महत्वाची कामगीरी बजावली जाते. मात्र सुविधा पुरवताना दुजाभाव का केला जातो? असा सवाल जीत सिंह यांनी व्हिडीओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. मुळचे मथुराचे असणारे जीत सिंह सध्या अबूमध्ये कर्तव्य बजावत आहेत. सीआरपीएफचे जवान देखील लष्काराच्या जवानांइतक्याच प्रतिकूल परिस्थितीत दिवसरात्र काम करतात. मग त्यांना सुविधा देताना भेदभाव का केला जातो? असा प्रश्न उपस्थित करताना जीत सिंह यांनी पंतप्रधान मोदींनी या प्रश्नात लक्ष घालावे, असे आवाहन जीत सिंह यांनी केले आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin