Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


पत्रकारांना पाहून आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा पळ


Main News

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - व्हायब्रंट गुजरात संमेलनात सहभागी होण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल बुधवारी ( दि.११ ) गांधीनगरमध्ये आले होते. यावेळी उर्जित पटेल महात्मा मंदिरात गेले होते. यावेळी त्या ठिकाणी बरेच पत्रकार उपस्थित होते. नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना उर्जित पटेल यांना अनेक प्रश्न विचारायचे होते. पत्रकार प्रश्नांची सरबत्ती करणार, याचा अंदाज उर्जित पटेल यांना आला आणि त्यांनी महात्मा मंदिराच्या मागील दरवाज्याने पळ काढला. असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. पत्रकारांचे प्रश्न टाळण्यासाठी उर्जित पटेल यांनी मंदिराच्या मागील दरवाज्याचा वापर केला. मात्र तरीही काही पत्रकारांनी उर्जित पटेल यांना पाहिले. उर्जित पटेल यांना प्रश्न विचारण्यासाठी पत्रकार शिड्यांकडे धावले. मात्र पत्रकार येत असल्याचे पाहताच उर्जित पटेल वेगाने धावू लागले. काही पायऱ्या सोडत अगदी ट्रेन पकडण्यासाठी धावत असल्याप्रमाणे उर्जित पटेल गाडीकडे धावू लागले. अखेर उर्जित पटेल त्यांच्या गाडीजवळ पोहोचले. त्यांनी पटकन गाडीचा दरवाजा उघडला, ते गाडीत बसले आणि गाडी वेगाने निघून गेली. दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या नोटाबंदीच्या निर्णयावरुन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनादेखील विरोधाला सामोरे जावे लागले. नोटाबंदीच्या निर्णयाच्या सव्वा महिन्यानंतर उर्जित पटेल रिझर्व्ह बँकेच्या एका बैठकीसाठी कोलकात्याला गेले होते. त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ‘उर्जित पटेल गो बॅक, उर्जित पटेल हाय हाय,’ अशा घोषणादेखील देण्यात आल्या.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin