Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


काँग्रेस व राष्ट्रवादीची भिस्त ग्रामीण भागावर


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – राज्यातील सुमारे चार कोटींपेक्षा जास्त नागरिक मतदानाचा हक्क बजाविणार असणाऱ्या दहा महापालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शहरी भागांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सत्तेतील भागीदार भाजप आणि शिवसेनेतच जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. नगरपालिका निवडणुकांचा कौल महापालिकांमध्ये कायम राहिल, असा भाजपच्या गोटात विश्वास असताना, मुंबई व ठाण्याचे गड कायम राखण्याकरिता शिवसेनेची कसोटी लागणार आहे. ग्रामीण भागातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे पारंपारिक वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सारे लक्ष हे मुंबईवर आहे. गेली लागोपाठ २० वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेला सत्तेतून दूर करण्याकरिता भाजपने शड्डू ठोकला आहे. युतीची चर्चा असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची एकूणच भूमिका लक्षात घेता युती होण्याबाबत साशंकता आहे. मुंबईत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला डोके वर काढू द्यायचे नाही, अशी भाजपची व्यूहरचना आहे. शिवसेनाही विधानसभा निवडणुकीचे उट्टे काढण्याकरिता उत्सुक आहे. मुंबई गमविल्यास शिवसेनेला मोठा धक्का असेल. राज्यात भाजपची ताकद वाढवायची असल्यास शिवसेनेचे अस्तित्व कमी व्हायला पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin