Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


मुंबईत युतीसाठी जागांची रस्सीखेच; भाजपची ११५ जागांची मागणी


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपशी युतीसाठी चर्चेची जाहीर अपेक्षा व्यक्त केल्याने भाजपने त्याला प्रतिसाद दिल्याचा सणसणीत टोला मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी लगावला आहे. महापालिकेचा कारभार पारदर्शी राहील, या अटीवरच युती करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेकडून महापालिकेतील सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करीत असून ठाकरे यांनाच युतीची गरज वाटत असल्याचे दाखविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण तरीही ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात युती करावी, अशी भावना असल्याचे सांगत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु करण्यात आले असून मुंबई महापालिकेच्या जागावाटपासाठी रस्सीखेच सुरु आहे. भाजपला ११५ जागांची अपेक्षा असून शिवसेना मात्र ८५-९० पर्यंत जागा सोडण्यास तयार आहे, असे सूत्रांनी सांगितले.भाजपही १०० ते १०५ जागांवर तडजोड करण्याची शक्यता असल्याचे समजते. शिवसेनेतर्फे खासदार अनिल देसाई, अनिल परब तर भाजपकडून अॅड शेलार यांच्यासह काही नेते मुंबई व ठाण्याबाबत चर्चा करीत आहेत.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin