Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


महापालिका निवडणुकीत भाजपकडून पैसे लुट; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन


Main News

नागपूर, दि. १२ (पीसीबी) – नोटबंदीनंतर केवळ भाजपकडे पैसा असून, महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांकडून पैसे लुटा, असे खळबळजनक आवाहन भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. भाजप शिवसेनेला संपवण्यिाचे काम करत असून, शिवसेना भाजपची युती होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे मिमीक्री आर्टिस्ट असल्याची खिल्लीही त्यांनी उडवली आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना आंबेडकर यांनी शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली आहे. नोटबंदीनंतर केवळ भाजपकडेच पैसे असल्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोपाला आंबेडकर यांनी दुजोरा दिला. भाजपकडून या निवडणुकीत मोठया प्रमाणावर पैशांचा वापर केला जाणार आहे. परंतु मतदारांनी भाजपकडून हा पैसा लुटून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. महापालिका व जिल्हा परिषदेसाठी शिवसेना व भाजपमध्ये युतीच्या चर्चा सुरू आहेत. परंतु भाजपला सेनेला संपवायचे असल्याने ही युती होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin