Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


सहारा डायरी प्रकरणाची याचिका फेटाळली; पंतप्रधान मोदींना दिलासा


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - सहारा आणि बिर्ला डायरी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य नेत्यांची चौकशी करणाऱ्या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. प्रशांत भूषण यांनी ही याचिका दाखल केली होती. मात्र ठोस पुरावे नसल्याचे सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. सहारा आणि बिर्ला समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने २०१४मध्ये छापा टाकला होता. या छाप्यात काही डायरी सापडल्या होत्या. यात २००३मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना २५ कोटी रुपयांची लाच दिल्याचा उल्लेख करण्यात आला होता. याशिवाय अन्य तीन मुख्यमंत्र्यांना लाच दिल्याचे म्हटले होते. यासंदर्भात प्रशांत भूषण यांनी कागदपत्रे चौकशीसाठी सादर केली होती. मात्र ही कागदपत्रे पुरेशी नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याच डायरीच्या आधारावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप केले होते. दरम्यान, न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचा कोणताही उपयोग नाही. याचिका दाखल करणाऱ्या सीपीआयएल या संघटनेने ठोस पुरावे सादर करावेत असेही न्यायालयाने सांगितले.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin