Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


तरुणीला अश्लिल मेसेज पाठवणाऱ्याला दोन वर्षांची शिक्षा; न्यायालयाचा ४८ तासांत निकाल


Main News

पुणे, दि. ११ (पीसीबी) - तरुणीला मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठवणाऱ्या आरोपीला दोन वर्षांच्या कठोर कारावासाची आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खेड-राजगुरुनगर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आज घटनेनंतर अवघ्या ४८ तासांत आरोपीला शिक्षा सुनावली. ही राज्यातील पहिलीच घटना आहे. अतुल गणेश पाटील (चाकण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतुल गणेश पाटील याने तरुणीला तिच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठवला होता. या प्रकरणी आरोपीविरुद्ध चाकण पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला तातडीने अटक करून न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले होते. खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जे. तांबोळी यांच्यासमोर झाली. त्यांनी आरोपीला दोषी ठरवून दोन वर्षांची कठोर तुरुंगवासाची शिक्षा आणि ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एका महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin