Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


निवडणूक खर्चासाठी राजकीय पक्षांना स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - राज्यातील १० महानगरपालिका आणि २६ जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. निवडणुकीदरम्यान, निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे आणि पारदर्शकपणे पार पडावी तसेच राजकीय पक्षांकडून मतदारांना कोणत्याही प्रकारे भुलवणे किंवा त्यांना आकर्षित करण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात येईल. यामध्ये पोलीस विभाग, आयकर विभाग , राज्य उत्पादन शुल्क विभाग यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो. या समितीमध्ये कोणाचा समावेश करायचा याचे अंतिम अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मनपा आयुक्तांना असतील. दरम्यान, निवडणूक संपल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने ३० दिवसांच्या मुदतीमध्ये निवडणुकीच्या खर्चाचा तपशील आयोगापुढे सादर करणे बंधनकारक आहे. तर राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी केलेल्या निवडणूक खर्चाचा तपशील ६० दिवसांत सादर करावा लागणार आहे. याशिवाय, या निवडणुकांसाठी प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार असून निवडणुकीचा खर्च त्यामधूनच करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin