Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


मंगलाताई मुलांच्या डोक्यावरचे केस गेले आता तरी त्यांना नगरसेवक करा; खाडेंचे प्रतिआव्हान


Main News

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू यापूर्वी नगरसेवक होते. तसेच त्यांचे दुसरे बंधू राजेंद्र जगताप व नवनाथ जगताप हे सुद्धा विद्यमान नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांची काळजी सोडून तुमच्या मुलांच्या डोक्यावरचे केस उडाले आहेत आता तरी त्यांना महापालिकेत निवडून आणा, असे प्रतिआव्हान भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी राष्ट्रवादीच्या पक्षनेत्या मंगला कदम यांना दिले आहे. राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षनेत्या मंगला कदम भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना त्यांच्या तीन बंधूंना तीन वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आणण्याचे आव्हान दिले होते. त्याला भाजपचे माजी शहराध्यक्ष खाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिआव्हान दिले आहे. सदाशिव खाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, “आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे यापूर्वी नगरसेवक होते. मात्र आमदार असूनही लक्ष्मण जगताप यांनी २०१२ च्या निवडणुकीत आपल्या बंधूला थांबविले होते. आमदार जगताप यांचे दुसरे बंधू राजेंद्र जगताप आणि नवनाथ जगताप हे विद्यमान नगरसेवक आहेत. परंतु, महापालिका निवडणुकीत पराभव होण्याच्या भितीने सैरभैर झालेल्या राष्ट्रवादीच्या पक्षनेत्या मंगला कदम यांना जगताप बंधू नगरसेवक आहेत, याचा कदाचित विसर पडलेला आहे. या सर्वांऐवजी मंगला कदम यांनी आपल्या मुलांची अधिक काळजी करण्याची आवश्यकता आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin