Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल बूट भिरकावल्याने जखमी


Main News

मुक्तसर, दि. ११ (पीसीबी) - पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यावर एका व्यक्तीने बूट भिरकावला. त्यामुळे बादल यांचा चष्मा तुटला असून त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली आहे. त्यावेळी बादल यांच्या हातात पाण्याचा ग्लास होता. तोही खाली पडला. बूट फेकणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बादल हे लंबी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. बादल लंबी विधानसभा मतदारसंघातील रत्ता खेडा गावात बुधवारी सकाळी प्रचारासाठी सुरू असलेल्या संगत दर्शन कार्यक्रमासाठी आले होते. त्याचवेळी त्यांच्यावर बूट भिरकावण्यात आला. यापूर्वी बादल यांचा मुलगा आणि उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्या ताफ्यावर गेल्या रविवारी फाजिल्कामधील कंधवाला हाजर खां मध्ये दगडफेड झाली होती. ताफ्यावर १५ ते २० तरुणांनी दगडफेक केली होती. गावातील काही लोकांना काही मुद्द्यांवर चर्चा करायची होती. पण त्यांचे म्हणणे ऐकले नाही, त्यामुळे ते नाराज झाले. त्यानंतर काही लोकांनी सुखबीरसिंग बादल यांच्या ताफ्यावर दगडफेकही सुरू केली.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin