Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


पुढील वर्षी अॅपल लाँच करणार ड्युअल सिम असलेला 'आयफोन ८'


Main News

सोशल मीडियावर सध्या अॅपल पुढच्या वर्षात ‘आयफोन ८’ बाजारात आणणार असल्याच्या चर्चा आहेत. नवीन वर्षात अॅपल कंपनी ‘आयफोन ७ एस’, ‘आयफोन ७ एस प्लस ‘ आणि ‘आयफोन ८’ असे तीन फोन एकत्र लाँच करणार असल्याच्या चर्चा वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या आहेत.

फोर्ब्सच्या माहितीनुसार अॅपलने चीनच्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिसमध्ये ड्युएल सिमसाठी पेटंट दाखल केले आहे. अॅपलने आतापर्यंत जितके फोन बाजारात आणले आहेत ते सिंगल सिम आहेत. पण पुढच्या वर्षात अॅपलच्या फोनमध्ये ड्युअल सिम असेल अशाही चर्चा आहेत. एका अहवालानुसार अॅपलने बाजारात आणलेल्या आयफोन ७ ला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. ड्युअल सिमचे फिचर या फोनमध्ये नाही हे देखील अॅपल फोनचा घट होण्यामागे कारण असू शकते असे सांगितले जाते. म्हणूनच ग्राहकांची गरज लक्षात घेऊन अॅपल आता पुढील वर्षात पहिल्यांदाच ड्युअल सिम कार्ड असणारा आयफोन ८ आणणार असल्याचे समजते आहे.

आयफोन ८ ची कर्व्ह एज बॉडी असू शकते. हा आयफोन ४.७ इंच, ८ इंच आणि ५.५ इंचामध्ये बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये या आयफोनला होम बटन देखील नसणार असल्याचे समजत आहे. या फोनची एकूणच रचना आणि वैशिष्ट सांगणारे वेगवेगळे दस्ताऐवज अनेक टेक बेवसाईट्वर व्हायरल होत आहे. या आयफोन ८ ला ‘फेरारी’ असे गुप्तनावही देण्यात आले आहे. हा आयफोन पूर्णपणे वायलेस चार्जिंग सिस्टम असणार आहे. अॅपलकडून तरी अधिकृतरित्या याबद्दल काही सांगण्यात आले नाही. अॅपल नेहमीच आपल्या उत्पादनाबद्दल गुप्तता बाळगून असतो. त्यामुळे या फोनची लाँचिग तारीख जशी जवळ येते, तशी ग्राहकांची उत्सुकता ताणली जाते. पण कदाचित पहिल्यांदाच आयफोन ८ संदर्भातील अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या वेबसाईट्सवर वाचायला मिळत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin