Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


.....आता ट्विटरवरुनही लाईव्ह प्रक्षेपण करा, कोणत्याही वेगळ्या अॅपशिवाय


Main News

ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटने प्रत्येक स्मार्टफोनधारकांना लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. साधारणपणे वर्षभरापासून ट्विटरने अधिग्रहित केलेल्या पेरिस्कोप या अॅपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रिमिंग म्हणजेच थेट प्रक्षेपणाची सुविधा यापूर्वीच होती. आता कोणत्याही त्रयस्थ अॅपशिवाय थेट ट्विटर कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही जे काही पाहात आहात ते आता थेट प्रक्षेपित करु शकता. तुम्हाला ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांच्या टाईमलाईनवर तुमचे थेट प्रक्षेपण प्रसारित होत राहील.

 

ट्वीटरने काल #GoLive या हॅशटॅगने जारी केलेल्या ट्वीटमधून लाईव्ह स्ट्रिमिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली. तुम्हाला ट्विटरच्या मदतीने काहीही लाईव्ह करायचे असेल तर आपल्या स्मार्टफोनमधील ट्विटर अॅप ओपन करा. त्यानंतर नवीन ट्वीट टाईप करण्यासाठी क्लिक करा. तिथे असलेल्या कॅमेऱ्याच्या इमेजवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला स्टिल कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेला लाईव्हचा पर्याय दिसेल.

 

या लाईव्हच्या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही थेट प्रक्षेपणासाठी सज्ज आहात. तुम्ही कशाचे थेट प्रक्षेपण करणार आहात, त्याविषयी थोडक्यात माहिती द्या आणि करा सुरुवात थेट प्रक्षेपणाला. ट्विटरच्या मालकीच्या पेरिस्कोप या लाईव्ह स्ट्रिमिंग अॅपच्या मदतीने लाईव्ह स्ट्रिमिंग करणे, हे से खूप लोकप्रिय झाले आहे. पॅरीसमध्ये झालेला अतिरेकी हल्ला हा पेरिस्कोप लाईव्हमुळेच संबंध जगाला समजला से सांगितले जाते.

 

सोशल नेटवर्किंग मधील सर्वात मोठे नाव असलेल्या फेसबुकने यापूर्वीच आपल्या यूजर्सना लाईव्ह स्ट्रिमिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तर डेस्कटॉप लाईव्ह स्ट्रिंमिंगचा पर्याय खूप आधीपासून असलेल्या आणि व्हिडिओचा सर्वात मोठा संग्रह असलेल्या यूट्यूबनेही आता स्मार्टफोनमधून लाईव्ह स्ट्रिमिंगची सोय करुन दिली. मात्र भारतात अजून हा पर्याय यूट्यूब यूजर्सना मिळालेला नाही.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin