Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


यापुढे चुकून पाठवलेले मेसेज आता एडिट करता येणार


Main News

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – भारतामध्ये सगळ्यात जास्त व्हॉट्सअॅप  वापरले जात असल्याचे एका सर्वेक्षणानुसार सिध्द झालेले आहे. या अॅपचा वापर करुन आपण किती एकमेकांच्या जवळ आलो आहोत. याची आपल्याला कल्पना देखील नसेल. या अॅपच्या माध्यमातून आपण वेगवेगळे ग्रुप बनवलेले आहेत. ऑफिसराच ग्रुप, शाळा कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप, कुटुंबियांचा ग्रुप, बिल्डिंगमधला ग्रुप असे ग्रुप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दहा ग्रुप जर असतील तर अशा व्यक्तींना मेसेच फॉरवर्ड करतांना काळजी घ्यावी लागत असायची. कारण एखाद्याला पाठविलेला मेसेज एडिट करता येत नव्हता. पण यापुढे आता व्हॉटसअॅप धारकांना काळजी करायचे काही कारण नाही. पाठविलेला मेसेज आता एडिट करता येणार आहे.

व्हॉट्सअॅपवर लवकरच मेसेज एडिटचा पर्याय उपलब्ध होणार आहे. WABetaInfo या ट्विवटर अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप प्रायोगिक तत्त्वावर रिव्होक आणि एडिट हे फिचर्स अॅड करणार येणार आहे. 

या ग्रुपमध्ये मेसेज फॉरवर्ड करताना अनेकदा चुकून मेसेज जातो. मग आपली चांगलीच पंचाईत होते. त्यामुळे लवकरच चुकून गेलेले मेसेज एडिट करण्याचा नवा पर्याय व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार आहे.

व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करत असताना अनेकदा अनावधानाने आपले मेसेज चुकून भलत्यालाच जातात. कधी कधी तर आपल्या प्रेयसी किंवा प्रियकरला पाठवायचा मेसेज चुकून ग्रुपवर किंवा तिस-यालाच पोहचतो. असे अनेक प्रसंग तुमच्या वाट्याला आले असतील. असे मेसेज गेल्यावर किती हसे होते आपले. पण भविष्यात असे हसे करून घेण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. कारण व्हॉट्सअॅपवर लवकरच मेसेज एडिटचा पर्याय उपलब्ध होणार आहे. WABetaInfo या ट्विवटर अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप प्रायोगिक तत्त्वावर रिव्होक आणि एडिट हे फिचर्स अॅड करणार आहे. त्यामुळे, युजर्स ठराविक वेळेमध्ये पाठवलेले मेसेज डिलीट किंवा इडिट करु शकणार आहेत.

व्हॉट्सअॅप बीटाच्या अँड्राईड २.१७.१.८६९ या व्हर्जनवर हे फिचर्स उपलब्ध आहेत. पण जुना मेसेज  मात्र एडिट करता येणार नाही. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय आपल्या युजर्सना उपलब्ध करून दिला होता. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin