Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


इंटरनेट स्पीडमध्ये जगाच्या तुलनेत भारत कुठे?


Main News

दि. १३ (पीसीबी) - नोटाबंदीनंतर सरकारने आता डिजिटल पेमेंट म्हणजेच कॅशलेस व्यवहारांकडे मोर्चा वळवला आहे. मात्र भारत डिजिटल होण्यासाठी किती सक्षम आहे, यावर नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपनी ‘अकामाई’च्या स्टेट ऑफ दी इंटरनेट – कनेक्टिव्हिटी रिपोर्टने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 

भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या २०१६ च्या अखेरपर्यंत २० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कारण ग्रामीण भागात बहुतांश लोक सध्या फीचर फोन वापरतात. फीचर फोन वापरणाऱ्यांना इंटरनेटविना कॅशलेस व्यवहारासाठी यूएसएसडीचा मार्ग आहे. मात्र हा मार्ग अनेकांना कठिण वाटतो.

अकामाईच्या रिपोर्टनुसार भारताचा इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जागतिक स्तरावर पहिल्या शंभर देशांच्या यादीतही क्रमांक लागत नाही. आशिया खंडात भारत आणि फिलीपाईन्स हे दोनच देश असे आहेत, ज्यांना इंटरनेच्या ४ एमबीबीएस एवढ्या बेसिक स्पीड पर्यंतही आतापर्यंत पोहचता आलेले नाही.

काय आहे हा ‘अकामाई’चा अहवाल?
इंटरनेटच्या सरासरी स्पीडच्या यादीत सर्वात खाली म्हणजे ३.५ Mbps सह ११४ व्या स्थानावर आहेत. जगात सर्वाधिक सरासरी इंटरनेट स्पीड असणारा देश दक्षिण कोरिया आहे. इथे २९ Mbps एवढे सरासरी इंटरनेट स्पीड आहे.

इंटरनेट पीक स्पीडमध्ये सिंगापूरने बाजी मारली आहे. सिंगापूरमध्ये १४६.९ Mbps वेगाने डाऊनलोडिंग केली जाऊ शकते. दक्षिण कोरिया पीक स्पीडच्या बाबतीत १०३.६ Mbps सह चौथ्या स्थानावर आहे. भारत इंटरनेट पीक स्पीडच्या बाबतीत २५.५ Mbps सह १०४.५ या क्रमांकावर आहे, तर फिलीपाईन्स २९.९ या पीक इंटरनेटसह भारताच्या वर म्हणजे ८८ व्या क्रमांकावर आहे. याचाच अर्थ इंटरनेट सर्फिंगसाठी सर्वाधिक अडथळा भारतामध्ये येतो.

मोबाईलवर जगात सर्वाधिक जलद इंटरनेट इंग्लंडमध्ये आहे. इथे २७ Mbps या वेगाने मोबाईलवर सर्फिंग केली जाऊ शकते, तर भारतात मोबाईल इंटरनेट स्पीडची सरासरी ३.२ Mbps एवढी आहे.

कॅशलेस होण्यासाठी इंटरनेट हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. मात्र भारत इंटरनेट मजबूत असणाऱ्या देशांच्या यादीत सर्वाधिक खालच्या स्थानावर आहे.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin