Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


........ आता स्मार्टफोनमधून प्रत्यक्ष भेटता येणार !


Main News

तुमचा आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री विषयी तुम्ही वृत्तपत्रात/ मासिकात काही वाचताय किंवा त्यांना टीव्हीत पाहताय आणि अचानक काहीतरी जादू होऊन ते प्रत्यक्ष तुमच्या समोर अवतरले तर?! हे शक्य आहे का, असा विचार मनात आला असेल ना... पण हे खरोखर शक्य झाल आहे. लंडनच्या ब्लिपर कंपनीने आपल्या स्मार्टफोन अॅपद्वारे एखाद्या व्यक्तिच्या संपूर्ण प्रोफाइलसह तिचा चेहरा तुमच्यासमोर प्रत्यक्ष उभा करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

 

मिनिटा मिनिटाला स्मार्टफोनच्या दुनियेत तांत्रिकदृष्ट्या क्रांतिकारी बदल होत आहेत. स्मार्टफोन्समधून तुम्हाला जिवंतपणाचा अनुभव देणाऱ्या 'ब्लिपर' या कंपनीने नुकतेच 'ऑग्मण्टेड रिअॅलिटी फेस प्रोफाइल्स' अर्थात कोणाचाही चेहरा प्रत्यक्ष पाहता येईल, अशा पद्धतीच्या नव्या फिचरची घोषणा केली आहे. कंपनीच्या अॅपमध्ये आता लवकरच हे नवे फिचर समाविष्ट केले जाणार आहे.

 

हे नवे फिचर प्रिंट आणि टीव्ही (लिखित, दृश्य) अशा कोणत्याही माध्यमातून कोणाही व्यक्तीचा चेहरा स्कॅन करून लगेचच त्याची ओळख पटवून तो चेहरा त्याच्या वास्तव स्वरुपात पाहण्याची सुविधा ग्राहकांना देते. जणू काही ती व्यक्ती आपल्या समोरच उभी आहे, असे चित्र निर्माण करते.

 

ओळख पटून जिवंत आपल्या समोर उभ्या राहतील अशा जवळ जवळ ७० हजार प्रसिद्ध व्यक्तिंचे चेहरे यात समाविष्ट करण्यात येणार असून त्यात कलाकार, राजकारणी, संगीतकार, गायक, उद्योजक, लेखक, खेळाडू, शास्त्रज्ञ आदी त्या-त्या क्षेत्रातील प्रसिद्ध मंडळींचा त्यात समावेश आहे. या फिचरमधून लवकरच स्वतःचा चेहराही प्रत्येकाला आपल्या प्रोफाइलसह अॅड करता येणार आहे. जेणेकरून आपला चेहरा आपोआपच स्कॅन होऊन इतरांनाही त्यांच्या स्मार्टफोनवर तो पाहता येईल. सध्या तरी केवळ प्रसिद्ध व्यक्तिंचेच चेहरे दिसण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे.

 

प्रसिद्ध व्यक्तिंचे चेहरे त्यांच्या माहितीसह आपोआपच हेरले जातील. कंपनीच्या ब्लिपरस्पिअर या विभागाद्वारे उपलब्ध सार्वजनिक माहिती स्त्रोतांमधून अशा सार्वजनिक व्यक्तिंची माहिती मिळवली गेली आहे. ज्यांचे प्रोफाइल कंपनी सेट करणार आहे, अशा प्रसिद्ध व्यक्तीदेखील स्वतःचे 'AR फेस प्रोफाईल' स्वतःच तयार करू शकतील असा पर्यायही अॅपमध्ये आहे.

 

स्मार्टफोनच्या दुनियेत प्रथमच असे तंत्रज्ञान विकसित केले असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ऑग्मण्टेड रिअॅलिटी फेस प्रोफाइल्स' तंत्रज्ञानामुळे आता संवाद आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीत खूप मोठा बदल

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin