Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


लॅपटॉपला असणाऱ्या आयताकृती स्लॉटचा उपयोग कसा कराल?


Main News

 – आजच्या काळात लॅपटॉपची गरज नित्याची झाली आहे. यामध्ये लॅपटॉप वापरण्यामध्ये तरुणाईचा सर्वात मोठा वाटा दिसतो आहे. लॅपटॉपचा वापर माहिती, डाटा साठविण्यासाठी केला जात असतो पण साठविलेली माहिती कोणी चोरणार नही ना? तसेच या लॅपटॉपची चोरी झाली तर माहितीचा गैरवापर करणार नाही ना? पण ह्या गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही. ऑलरेडी तुमच्या लॅपटॉपमध्ये सुरक्षेसाठी काही गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. पण याची माहिती नसल्यामुळे अनेक जण वापर करत नाहीत. तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या लॅपटॉपची सुरक्षा कशी ठेवाल यासंदर्भात माहिती देणार आहेत.

लॅपटॉपच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे स्लॉट असतात. युएसबी, इंटरनेट कनेक्शनसाठी वेगवेगळे स्लॉट लॅपटॉपला असतात. यात एक छोटा आयताकृती छेद किंवा स्लॉट असतो, याचा आपल्याला बऱ्याच जणांना कशासाठी असतो याची माहिती नसते. तर हा छोटा स्लॉट असतो तो लॅपटॉपच्या सुरक्षेसाठी.

लॅपटॉपची चोरी होऊ नये यासाठी लॅपटॉपच्या कोपऱ्यात एक छोटासा स्लॉट दिलेला असतो. काही लॅपटॉपमध्ये चार्जिंग पॉईंट जवळ असतो. तर काही लॅपटॉपच्या युएसबीच्या पोर्टजवळ हा पॉईंट असतो. ‘लॅपटॉप लॉक’ या स्लॉटमध्ये जोडायचे असते. त्यासाठी लॅपटॉप लॉकला मोठी वायरदेखील असते. याने तुम्ही लॅपटॉप एखाद्या वस्तूला जखडून ठेऊ शकता. ज्याप्रमाणे आपण साखळीने एखादी वस्तू बांधून ठेवतो तशाच प्रकारे लॅपटॉपही जोडून ठेवता येतो. पण हे लॉक अद्यावत तंत्रज्ञानयुक्त असे असते. 

एक युनिक पासवर्डद्वारे लॅपटॉप या लॉकमध्ये जखडला जातो. यासाठी लॅपटॉपच्या आतमध्ये तशी गुंतागुतीची प्रणाली तयार करण्यात आली असते. जोपर्यंत अचूक पासवर्ड टाकला जात नाही. तोपर्यंत हे टाळे उघडत नाही. 

त्यामुळे, लॅपटॉपची चोरी करणे जवळपास अशक्यच असते. साधरण २००० नंतर आलेल्या लॅपटॉपमध्ये ही प्रणाली पाहायला मिळते. ‘के स्लॉट’ म्हणूनही हा आयताकृती स्लॉट ओळखला जातो. लॅपटॉपची चोही होऊ नये यासाठी याचा आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ लागला आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin