Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


एटीएम, क्रेटीट कार्ड ६ सेकंदात होऊ शकते हॅक


Main News

 – केवळ ६ सेकंदात कोणीही हॅकर तुमचा क्रेडीट आणि डेबिट कार्ड नंबर, त्याची वैधता संपण्याची माहिती आणि सेक्युरिटी कोडचा अंदाज लावू शकतो. ऑनलाइन व्यवहारांना सुरक्षित ठेवण्यासाठी केलेले सर्व उपाय तोडण्यास यशस्वी झालेल्या तज्ज्ञांनी हा दावा केला आहे.

ऑटोमॅटिक आणि सिस्टीमव्दारे कार्डचा सेक्युरिटीशी संबंधित विविध माहिती एकत्रिक करुन विविध वेबसाइटवर ही माहिती टाकल्यास काही सेकंदाच्या आत सुरक्षेची संबंधित सर्व आकडे गोळा करता येऊ शकतात. अलिकडेच टेस्कोमध्ये सायबर हल्ला करण्यात आला होता. असाच अंदाज लावून हा हल्ला झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

तुमच्याकडे एक लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर हे काम आणखी सोपे होते. अशा प्रकारच्या हल्ल्यातून दोन त्रुटी समोर येतात. या त्रुटी फारशा गंभीर नाहीत. पण त्यांचा उपयोग एकसाथ केल्यास पूर्ण पेमेंट सिस्टिमसाठी हा मोठा धोका ठरु शकतो. अशी माहिती न्यूकासल विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या मोहम्मद अली यांनी दिली. 

विद्यमान पेमेंट सिस्टीमने वेगवेगळ्या वेबसाइटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारातून अनेक अमान्य गोष्टी कळत नाही. विद्यमान ऑनलाइन सिस्टीममध्ये विविध वेबसाइटच्या माध्यमातून एकाच कार्डसाठी अनेक अमान्य पेमेंट रिक्वेस्ट समजण्याची क्षमताच नाही. यामुळे अनेक वेबसाइटव्दारे अनेकदा प्रयत्न केले जाऊ शकतात. पण याबाबत फक्त व्हिसा नेटवर्कच तेवढे संवेदनशील आहे, असे 'आयईईई' सिक्युरिटी अँड प्रायव्हसी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin