Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


जपानमध्ये ‘वॉटरप्रूफ’ फोनला मोठी मागणी


Main News

- ‘वॉटरप्रूफ’ प्रकारातील मोबाइल फोन बाजारात आपले स्थान निर्माण करत असल्याचे चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत असले, तरी जपानमध्ये गेल्या एक दशकापासून अशा फोनला मोठी मागणी आहे. जपानमधील मोबाइल फोनधारकांची युरोपमधील युजर्सच्याही आधीपासून ‘वॉटरप्रूफ’ फोन वापरण्यास सुरुवात केली होती. 

‘वॉटरप्रूफ’ फोनची मागणी लक्षात घेता फोन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना जपानमध्ये लवकरात लवकर असे फोन बाजारात उतरावावे लागले आहेत. यामागे, जपानी महिला शॉवर घेताना स्वत:सोबत स्मार्टफोन नेणे पसंत करत असल्याचे प्रमुख कारण असल्याचे समजते. या कारणामुळे जपानमधील जवळजवळ सर्वच स्मार्टफोन हे ‘वॉटरप्रूफ’ असतात. एलजीदेखील जपानमधील आपल्या फोनधारकांसाठी ‘वॉटरप्रूफ’ फोनची निर्मिती करत असल्याचे समजते. 

जी-५ हा फोन ‘वॉटरप्रूफ’ नसल्याने एलजीला हा फोन जपानमधील बाजारात उतरवता आला नाही. मॉड्युलर फोन ‘वॉटरप्रूफ’ बनविणे शक्य नाही. बॅटरी काढण्याच्या सुविधेपेक्षा फोन ‘वॉटरप्रूफ’ असण्याला जपानी जनता जास्त प्राधान्य देत असल्याची माहिती एलजीचे ग्लोबल कम्युनिकेटर केन हांग यांनी दिली. जपानमधली पहिला ‘वॉटरप्रूफ’ फोन २००५ मध्ये लाँच झाला होता. कॅसिओ ५०२ एस हा जपानमधील पहिला ‘वॉटरप्रूफ’ फोन होता. त्यानंतर २०१० मध्ये मोटोरोला कंपनीने ‘वॉटरप्रूफ’ अँड्रोइड फोन लाँच केला. 

त्याव्यतिरिक्त सॅमसंगने गॅलेक्सी एस ५ २०१४ मध्ये लाँच केला. हा फोनदेखील ‘वॉटरप्रूफ’ होता. त्याचबरोबर सॅमसंगचा नोट ७ आणि अॅपलचा आयफोन ७ हे ‘वॉटरप्रूफ’ प्रकारातील फोन जपनमधील बाजारात उतरविण्याची संबंधित कंपन्यांची योजना असल्याचे समजते. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin