Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


पुढील वर्षी नोकियाचे २ स्मार्टफोन लाँच होणार


Main News

फिनलँड - एकेकाळी मोबाईल जगतावर अधिराज्य गाजवलेल्या नोकिया विस्मरणात केला आहे. त्याचे बाजारातील अस्तित्व सध्या दिसेनासे झाले आहे. मात्र २०१७ मध्ये नोकिया धडाक्यात पुनर्रागमन करण्याच्या तयारीत आहे. पुढील वर्षी नोकियाचे २ स्मार्टफोन बाजारात लाँच होणार असून मोबाईल मार्केटवर पुन्हा एकदा कब्जा करण्यासाठी या कंपनीने बाहू सरसावले आहेत.  
 
नोकियाचे मायक्रोसॉफ्टसोबत ‘नॉन कॉम्पिट’ करार आहे. हा करार २०१७ ला संपणार असल्याने नोकियाला स्वत:चे फोन बाजारात आणता येणार आहेत. नोकियाचे हे फोन अँड्राईड ओएसवर असणार आहेत. 
 
नोकिया या फोनची निर्मिती स्वत: करणार नसून त्यासाठी एचएमडी ग्लोबल या कंपनीची नियुक्ती करणार आहे. २०१७ ला नोकिया आणखी एक फोन लाँच करणार असून त्याबद्दल मात्र माहिती उपलब्ध झालेली नाही. 
 
२०१७ मधील नोकियाचा पहिला फोन डी१सी असेल. यात क्वॉलकॉम ४३० चीपसेट, अँड्रेनो ५०५ जीपीयू, ३ जीबी रॅम, ३२ जीबी रॉम, १९२० x १०८० पिक्सेल स्क्रीन रिझोल्युशन, १३ एमपी प्रायमरी आणि ८ एमपी सेकंडरी कॅमेरा असे या फोनचे स्पेसिफिकेशन आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin