Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


व्हॉट्सअ‍ॅपवरुन व्हिडिओ कॉल


Main News

- मेसेज आणि फोन कॉलिंगनंतर ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरुन आता आपल्याला व्हिडिओ कॉलही करता येणार असून, नुकतीच या नव्या फिचर्सची घोषणा करण्यात आली. जगभरातील एक अब्ज ग्राहकांना टप्प्पाटप्पाने ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या नव्या फिचरमुळे फेसटाइम, स्काईप आणि गुगलडुओसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ कडून स्पर्धा निर्माण होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून आम्ही या फिचरवर काम करत होतो. भारत आमची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे इथे ही सुविधा सुरु करताना आम्हाला खूप समाधान वाटते आहे. व्हिडिओ कॉलची सेवा नेटवर्कवर अवलंबून असेल. नेटवर्क जितके चांगले तितकी चांगली सेवा मिळू शकेल. मेसेजप्रमाणेच कॉलबाबतही संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल, असे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतात दिवसाला सुमारे १० कोटी व्हॉइस कॉल केले जातात. त्यामुळे भारत सर्वांत सक्रिय व्हॉइस कॉलिंग देशांपैकी एक आहे, अशी माहिती जून महिन्यात ‘व्हॉट्सअ‍ॅप’कडून देण्यात आली आहे.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin