Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


चलन बदल्यामुळे एटीएम सुरु होण्यास उशीर होणार ?


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - प्रत्येक एटीएममध्ये संबंधित चलनासाठी वेगवेगळ्या कॅसेट्स असतात. प्रत्येक कॅसेटला क्रमांकही असतो. याच कॅसेटमध्ये त्या चलनाची नोट टाकणे आवश्यक असते. त्या नोटेची लांबी, रुंदी आणि जाडी या सगळ्याचा विचार करुन कॅसेट्स तयार केलेल्या असतात. या कॅसेटमध्ये संबंधित चलन भरल्यानंतर ते ग्राहकांना आवश्यक रक्कम त्याच कॅसेटमधून पुरवत असते. 

चलन बदल्यामुळे अडचण काय?
केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्या आहेत. त्या जागी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या आहेत. रद्द केलेल्या ५०० च्या नोटा आणि नव्याने आणलेल्या ५०० च्या नोटा यामधील फरक समजून घेऊन प्रत्येक एटीएममधील कॅसेटमध्ये आवश्यक बदल करावे लागणार आहेत. ५०० रुपयांच्या नोटेसाठी हे बदल करणे फार वेळखाऊ नाही. पण २००० रुपयांच्या नोटा एटीएममध्ये ठेवायच्या असतील, तर त्यासाठी करावे लागणारे बदल हे अधिक वेळ घेऊ शकतात. एटीएमची जबाबदारी पाहणाऱ्या बँकेच्या व्यक्ती हे बदल करु शकत नाही. तर त्यासाठी ते एटीएम ज्या कंपनीचे आहे. त्याच कंपनीचा इंजिनिअर प्रत्येक एटीएमच्या ठिकाणी बोलवावा लागेल आणि त्याच्याकडूनच हे बदल करुन घ्यावे लागतील, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वेळ का लागणार?
प्रत्येक बँकांची एटीएमची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. यापैकी बहुतांश मोठ्या बँकांच्या एटीएमचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडून केले जाते. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेऊनच त्यांना एटीएममध्ये रोकड भरण्याचे काम करावे लागते. या दोघांमधील समन्वयासोबतच आधी म्हटल्याप्रमाणे चलन बदलल्यामुळे प्रत्येक एटीएममध्ये नवे चलन भरण्यापूर्वी तिथे ज्या कंपनीचे एटीएम मशीन आहे. त्या कंपनीच्या इंजिनिअरलाही बोलवावे लागणार आहे. एटीएमची जबाबदारी सांभाळणारे दोन अधिकारी आणि इंजिनिअर यांच्या उपस्थितीतच प्रत्येक एटीएममध्ये कॅसेटमध्ये आवश्यक बदल करावे लागतील. सर्वसाधारणपणे प्रत्येक एटीएममध्ये हे बदल करण्यासाठी २५ ते ३० मिनिटांचा कालावधी आवश्यक आहे. हे झाल्यानंतर तिथे टेस्टिंगही करावे लागेल. म्हणजे ग्राहकांनी रक्कम नोंदवल्यावर कोणत्या कॅसेटमधून कोणती नोट घेतली जाईल आणि ती कशा पध्दतीने ग्राहकांना दिली जाईल, याचेही टेस्टिंग करावे लागेल. ते झाल्यानंतरच ते एटीएम ग्राहकांच्या वापरासाठी खुले करता येईल.

तांत्रिक अडचणी काय?
एटीएम हे पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित मशीन आहे. ग्राहकांना पैसे देण्याचे काम हे मशीन करीत असले, तरी त्यामागे मोठी यंत्रणा कार्यरत असते. या यंत्रणेमध्येही नव्या चलनानंतर काही बदल करावे लागणार आहेत. काही ठिकाणी मशीनचे सॉफ्टवेअर अपडेट करावे लागू शकते. त्याचबरोबर मशीन नवे चलन योग्य पध्दतीने ग्राहकांना काढून देते आहे ना? त्यामध्ये नोटा अडकत नाहीत ना? यावरही लक्ष ठेवावे लागले आणि आवश्यकतेप्रमाणे प्रत्येक एटीएमच्या ठिकाणी जाऊन तिथे काम करावे लागेल. हे सर्व सुरळीत होण्यास वेळ द्यावाच लागणार आहे.

ग्राहकांनी काय करावे?
एटीएम सुरु झाले म्हणून ग्राहकांनी विनाकारण रोकड काढण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात गर्दी करु नये. आपले जे व्यवहार इलेक्ट्रॉनिक कार्ड, डिमांड ड्राफ्ट या माध्यमातून होऊ शकतात. तिथे त्याचाच वापर करावा. रोकड पैशांचे व्यवहार पुढील काही दिवस शक्यतो टाळावेत. जीवनावश्यक वस्तूंसाठीच रोकड रक्कमेचा उपयोग करावा. एटीएमधून रोकड काढण्यासाठी गर्दी करण्यापेक्षा गरज असल्यास नजीकच्या बँकेत जाऊन पैसे काढावेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin