Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


आयफोन ७च्या बॅटरीच्या स्फोटामुळे कारला लागली आग


Main News

सिडनी, दि. २२ (पीसीबी) - सॅमसंग गॅलॅक्सी नोट ७ प्रमाणे आता अॅपलच्या आयफोन ७ ला ही आग लागल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. ऑस्ट्रेलियात न्यू साऊथ वेल्समध्ये ही घटना घडली.  मॅट जोन्स यांनी आयफोन ७ च्या स्फोटामुळे आपल्या गाडीला आग लागल्याचा दावा केला आहे.

मॅट जोन्स त्यांची गाडी न्यू साऊथ वेल्सच्या रस्त्यावर पार्क करुन फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडले. बाहेर निघताना त्यांनी आयफोन ७ एका कपडयामध्ये गुंडाळून ठेवला होता. जेव्हा ते फिरुन आले तेव्हा त्यांना गाडीमधून धूर येताना दिसला. कपडयामध्ये गुंडाळलेला आयफोन ७ जळत होता. आयफोन ७ मुळे आग लागून आपल्या गाडीच्या इंटीरीयरचे नुकसान झाल्याचा त्यांचा आरोप आहे. 

ज्या कापडात आयफोन ७ ठेवला होता ते कापड उघडले असता आत ठेवलेला फोन पूर्णपणे वितळल्याचे दिसून आले, असे जोन्स यांनी सांगितले. अॅपलच्या या बहुचर्चित फोनबद्दल यापूर्वीही अनेक तक्रारी आल्या आहेत. अॅपलला या घटनांची पूर्ण माहिती असून, अशा प्रकारे अचानक फोन पेट घेण्याच्या घटना कशामुळे घडत आहेत त्याचा अॅपल तपास करत आहे. 

आयफोनला आग लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही आयफोन ७ प्लसचा स्फोट झाल्याचे वृत्त होते. याआधी सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट ७ या स्मार्टफोनलाही खराब बॅटरीमुळे आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. इतकी महागडी वस्तू घेऊनही सुरक्षा मिळत नसेल तर काय उपयोग असा युझरचा सवाल आहे. Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin