Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


अखेर व्हॉट्सअॅपची व्हिडीओ कॉलिंग सेवा सुरु !


Main News

 - सातत्याने नवनवे फीचर्स घेऊन येणाऱ्या व्हॉट्सअॅपने आणखी एक भन्नाट फीचर आणले आहे. लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने अखेर व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केल आहे. मात्र,  हे फीचर तूर्तास विंडोज फोनवरच उपलब्ध आहे. सध्या v2.१६.२६० या बिटा व्हर्जनवर हे फीचर उपलब्ध करण्यात आल आहे.

व्हिडीओ कॉल कसा करायचा?

व्हॉट्सअॅपवरुन व्हिडीओ कॉल करण अगदी सोप आहे. तुम्हाला केवळ कॉलिंग बटणवर जाऊन व्हॉईस आणि व्हिडीओ ‘Voice’/ ‘Video’ या पैकी एक पर्याय निवडायचा आहे. याशिवाय तुम्हाला फ्रंट कॅमेरा किंवा रिअर कॅमेराचा पर्यायही निवडता येणार आहे. इतकच नाही तर तुम्हाला मिस्ड कॉलचं नोटिफिकेशनही येईल. त्यावर टॅप करुन तुम्ही कॉल बॅक करु शकता.
अँड्रॉईडवर व्हिडीओ कॉलिंग कधी?

सध्या हे फीचर विंडोज फोनवरच उपलब्ध आहे. मात्र ते अँड्रॉईड आणि iOS वर कधी उपलब्ध होणार याबाबतची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र,  विंडोजवर हे फीचर आल्यामुळे अँड्रॉईड आणि iOS वरही लवकरच हे फीचर उपलब्ध होईल. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin