Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


‘कॉमेट’ पाण्यावर तरंगणारा जगातील पहिला स्मार्टफोन


Main News

  स्मार्टफोनचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला दिवसेंदिवस हायटेक करण्यात येत आहेत. संशोधकांनी आता पाण्यात तरंगणारा स्मार्टफोन तयार केला आहे. ‘कॉमेट’ कंपनी लवकरच हा स्मार्टफोन लॉंच करणार आहे. यात हायटेक फिचर्स आहेत. पण याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यात टाकल्यावरही तो बुडणार नाही. लगेच पाण्यावर येईल. कंपनीने या स्मार्टफोनची प्रीबुकिंग सुरु केली आहे.

  कॉमेट हा फोन ३२ जीबी आणि ६४ जीबी अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. या दोन्ही मॉडेलवर ४० टक्के सवलत देण्यात आली आहे. ३२ जीबी मॉडेलची किंमत सुमारे १६ हजार तर ६४जीबी मॉडेलची किंमत सुमारे १९ हजार रुपये असणार आहे. ऑफिशिअल वेबसाईटवर याची प्रीबुकिंग करण्यात येत आहे.

  ४.७ इंचाचे Full HD AMOLED स्क्रीन डिस्प्ले, पॉवरफुल 2Ghz ऑक्टा-कोर प्रोसेसर, अल्ट्रा-फास्ट टेक्नोलॉजी, यासह ४ जीबी रॅम, अॅंड्रॉईडची ५.१ मार्शमेलो ऑपरेस्टिंग सिस्टिम, १६ MP रियर आणि फ्रंट कॅमेरा, ऑटोफोकस LED फ्लॅशसह हाय क्वालिटी पिक्चर्स घेण्यासाह HD व्हिडिओ रेकॉर्डिंग, सेक्युरिटीसाठी मिलिटरी ग्रेड २५६ बिट AES व्हाइस कम्युनिकेशन, ३ जी, ४ जी आणि WiFi नेटवर्क, ड्युअल सिम (LTE आणि GSM), म्युझिक आणि व्हिडिओचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी दमदार साऊंड सिस्टिम, LED नोटिफिकेशन लाइट, २८०० mAh ची बॅटरी इतक्या सर्व नाविन्यपुर्ण वैशिष्ट्यांनी सज्ज असा हा फोन लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. 

हा फोन जेट ब्लॅक, लाइट गोल्ड आणि आइसबर्ग व्हाइट या रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसेच या स्मार्टफोनला IPX7 सर्टिफिकेट देण्यात आले आहे. हा कम्प्लिट स्मार्टफोन असल्याचे हे प्रमाण आहे. तसेच हा पाण्यावर तरंगतो देखील. तसाच हा डस्टफ्रुपही आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin