Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


सॅमसंग ‘गॅलेक्सी नोट ७‘चे उत्पादन आणि विक्री बंद


Main News

सोल, दि. ११ (पीसीबी) - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपले प्रचलित उत्पादन ‘गॅलेक्सी नोट ७‘चे उत्पादन आणि विक्री कायमची थांबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वॉल स्ट्रीट जर्नल वृत्तपत्रातर्फे देण्यात आली आहे. खराब दर्जामुळे अनेक स्मार्टफोन माघारी बोलविण्यात आल्याने ब्रँडच्या प्रतिष्ठेला धक्का पोचला आहे.

काल स्मार्टफोनचे उत्पादन तात्पुरते थांबविण्याची घोषणा केल्यानंतर आज कंपनीने त्याची विक्री बंद करणार असल्याचे सांगितले आहे. आयफोनला स्पर्धा देणारा स्मार्टफोन वापरताना ओव्हरहिटींग आणि बॅटरी ड्रेनेजची अडचण आल्याने अनेक ग्राहकांना डिव्हाईस बदलून देण्यात आले होते. परंतु बदलून देण्यात आलेल्या डिव्हाईसमध्येदेखील हीच समस्या आढळून येत होती. काही डिव्हाईसेसना आग लागल्याची घटना घडल्यानंतर गेल्या महिन्यात कंपनीने २५ लाख गॅलेक्सी नोट माघारी बोलाविण्याची घोषणा केली होती.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin