Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


ट्रायंफची नवी बाईक 'बॉनव्हील T१००'चं लवकरच लाँचिंग


Main News

-  ट्रायफनं आपली नवी बाईक ‘बॉनव्हील T१००’ हे  मॉडेल ट्रायंफने नव्याने बाजारात आणली आहे. ‘बॉनव्हील’ ही बाईक अनेक रायडर्सची ‘ड्रीम बाईक’ आहे. ट्रायंफच्या इतर मॉडेल्सच्या तुलनेत बॉनव्हीलची लोकप्रियता प्रचंड आहे. तुलनाच करायची तर रॉयल एनफिल्डच्या बुलेट ५०० सारखी साधी सरळ रचना पण परफॉर्मन्सबद्दल विचाराल तर तिथ मात्र तुलना होऊच शकत नाही. रस्ता कसाही असो, वातावरण कसलही असो ‘बॉनव्हील’ रस्त्यावर सम्राटासारखी वावरते.

ट्रायंफने ‘बॉनव्हील T१००’ ही गाडी संपूर्णपणे नव्याने  जन्माला न घालता ‘बॉनव्हील’च्या दोन आधीच्या मॉडेल्समधल्या सर्वोत्तम गोष्टी घेऊन बनवली आहे. म्हणजेच या गाडीच इंजिन हे ‘बॉनव्हील स्ट्रीट ट्वीन’ या बाईकच आहे.  तर, चेसीस आणि बॉडी स्ट्रक्चर हे ‘बॉनव्हील T१२०’ या बाईकमधून उचले आहे.

 जर्मनीतल्या इंटरमोट मोटरसायकल ट्रेड शोमध्ये ट्रायंफने ही बाईक पहिल्यांदा सादर केली. भारतात ही गाडी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतात या गाडीची अंदाजे किंमत असेल सुमारे १० लाख रुपये. भारतात सध्या या श्रेणीतली सगळ्यात जास्त विकली जाणारी बाईक म्हणजे बुलेट. जिची किंमत जवळपास दीड लाखांच्या घरात आहे. किमतीमधल्या या फरकामुळेच ‘बोनव्हील’ ही चाहत्यांची फक्त ‘ड्रीम’ बाईकच बनून राहिली आहे. आता ‘बोनव्हील T१००’ या गाडीला कसा प्रतिसाद मिळतो ते लवकरच कळेल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin