Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


एकाच एटीएमव्दारे आता होणार अनेक कामे


Main News

तुम्ही एटीएमला केवळ पैसे काढण्याचे यंत्र समजत असाल, तर तुम्हाला दृष्टीकोनात बदल करुन घेण्याची गरज आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातील टर्नर रस्ता येथील ‘कॅश मॅनेजमेंट सोल्युशन’ अंतर्गत चालणाऱ्या एटीएम केंद्रात गेल्यानंतर डेबिट अथबा क्रेडिट कार्डविना तुमचे कोणतेही काम चुटकीसरशी होऊ शकते. या एटीएमव्दारे सिनेमांची तिकिटे खरेदी करणे, कोणतीही देयके अदा करणे यांसह अगदी विमानाची तिकिटेही काढली जाऊ शकतात.

सर्वांत महत्वाचे म्हणजे हे मशिन बँकेत नोंदणी करण्यात आलेल्या ग्राहकाच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून किंवा आधार कार्डचा उपयोग करुन वरीलपैकी सर्व कामे चुटकीसरशी करु शकते. या एटीएमचा वापर केवळ पैसे काढवण्यासाठीच न करता भविष्यात या माध्यमातून विजेचे बिल, घरगुती गॅसचे बिल, बाजारभावानुसार सोन्याचे नाणे खरेदी करणे आदी व्यवहारही करता येणार आहेत. त्याचीच एक झलक या मशिनच्या माध्यमातून पाहण्यास मिळते. ग्राहकांना एकाच जागी जाऊन सर्वप्रकारची कामे करता यावीत, यासाठी अशी ‘ऑल इन वन’ मशिन तयार करण्यात येत आहेत. एफएसएस, सीएमएस, एजीएस, ओईएम आणि डायबोल्डसारख्या कंपन्या अशाप्रकारची अत्याधुनिक एटीएम मशिन तयार करीत आहेत. या अत्याधुनिक मशिनव्दारे आगामी काळात विदेशी चलन विनिमय, कर्जाची परतफेड, मोबाईल रिचार्ज तसेच डीटूएचचे रिचार्ज करणेही शक्य होणार आहे.

मुंबईतील ‘एजीएस इनोव्हेशन सेंटर’ येथे बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक एटीएम मशिनच्या माध्यमातून सोन्याच्या नाण्याच्या खरेदीव्यतिरिक्त त्याच्या शुध्दतेविषयीचेही प्रमाणपत्र देण्याची सुविधा त्यात आहे. ‘एजीएस’ चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालन रवी गोयल म्हणाले की, ‘या एटीएमच्या सुरक्षेचा पूर्ण बंदोबस्त आम्ही केला आहे. फायरवॉल, एटीएम शटडाउन आदींचा त्यात समावेश आहे. या एटीएमच्या माध्यमातून बँकेचे खाते उघडले जाऊ शकते. त्यांनतर एटीएम कार्डही दिले जाते. या एटीएमव्दारे केवायसीही तपासले जाऊ शकते, असेही गोयल यांनी नमूद केले.

पन्नास हजारांपर्यंत कर्जवाटप

इलेक्टॉनिक पेमेंट अँड सर्व्हिसचे अध्यक्ष सी. चंद्रशेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार अशाप्रकाच्या एटीएमच्या माध्यमातून ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज त्वरीत उपलब्ध होणार आहेत. अल्प रकमेचे कर्ज देण्यासाठी ग्राहकांच्या तपशीलाप्रमाणे बँकांना काही नियम तयार करावे लागणार आहेत. त्यानंतर ग्राहक एटीएम केंद्रावर जाईल, कार्ड स्वाइप करेल, कर्जाऊ रकमेची निश्चिती करेल, त्यासाठी घालून दिलेल्या नियमांची पूर्तता करेल, ग्राहकांची खात्री करण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाचा उपयोग करेल. या सर्व नियमांची पूर्तता केल्यानंतर काही सेकंदातच कर्जाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात हस्तांतर करण्यात येईल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin