Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


व्हॉटसपला टक्कर देणार गुगलचे 'अॅलो'


Main News

गुगलने स्वत:चे इंन्स्टंट अॅप Allo लॉन्च केले आहे. हे अॅप आजपासून अॅन्ड्रॉइज आणि ios वापरणाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. प्लेस्टेरवर आणि अॅपलच्या अॅप डाउनलोड केले जाऊ शकते.

काही दिवासांमध्ये गुगलचे अॅप व्हॉट्सअॅपला टक्कर देण्याची शक्यता आहे. कारम गुगल आपल्या सर्च इंजिनचा वापर करुन इतर मेसेंजरपेक्षा याल स्मार्ट बनवण्याचा प्रयत्न करणार हे मात्र नक्की.

स्मार्ट रिप्लाय फिचर-

याद्वारे त्वरीत रिप्लाय करणे शक्य आहे. रिप्लाय करताना तुम्हाला अनेक  सजेशन मिळतील त्याला टॅप करुन उत्तर देता येईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे समोच्याने तुम्हाला पाठवलेय हे समजेल. उदाहरण म्हणजे जर कोणी पाळीव प्रण्याच्या फोटो पाठवला तर तुम्हाला ‘क्यूट’ हा रिप्लाय करण्याचे सजेशन येईल.

असिस्टंट फिचर
गुगल असिस्टंटवर क्लिक केल्यास एक कन्वर्सेशन ओपन होईल. याद्वारे थेट गुगल चॅट बॉटसोबत चर्चा करु शकता. येथे तुम्हाला अनेक कॅटेगरी मिळतील ज्यामध्ये वेदर, गेम, स्पोर्ट्स, फन, ट्रांन्स्लेशन सारखे अनेक पर्याय आहेत. उदाहरण म्हणजे जर तुम्हाला एखाद्या खेळाचा स्कोर जाणून घ्यायचा असेल तर गेमवर क्लिक करा. तुम्हाल त्यविषयी सर्व माहिती मिळेल.

फोटोज, इमोजी आणि स्टिकर्स
गुगल Allo चॅट करताना टेक्स आणि इमोजी हवे  तितके मोठे करता येतात. फोटो सुद्धा एडिट करता येतो. याशिवाय गुगलने २५ प्रसिद्ध कलाकारांसोबत मिळून २५ कस्टम स्टिकर्स बनवले आहेत तेही तुम्ही वापरु शकता.

प्रायवसीसठी इनकॉग्नटो मोड
जर तुम्हाला प्रायवसी हवी असेल तर Allo मध्ये इनकॉग्निटो मोड देखील देण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin