Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


आता ट्विटरवर १४० अक्षरे असणारी पोस्ट टाकता येणार


Main News

ट्विटरवर आता १४० अक्षरे असणारी पोस्ट टाकता येणार आहे. कारण, आजपासून फोटो आणि जिफ वापरल्यास अक्षरांची संख्या कमी होणार नाही. काही महिन्यांपुर्वी ट्विटरने १४० अक्षरांची मर्यादा काढून टाकण्याची घोषणा केली होती. मात्र, तसे न करता नवीन बदलानुसार त्याच अक्षरसंख्येत अधिक माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे मिडीया फाइल अपलोड केल्यावर अक्षरांची संख्या कमी होण्याची युजर्सची तक्रार दुर होणार आहे.

मायक्रोब्लॉगिंग जगतातील सर्वात आघाडीवर असणारा डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे ट्विटर. अवघ्या १४० अक्षरांत व्यक्त होणे हे ट्विटरचे वैशिष्ट्य. त्यामुळे मोजक्या शब्दांत बोलण्याचा नेटकऱ्यांना छंदच लागला. परंतु एखादा फोटो किंवा मिडिया फाइल किंवा पोल पोस्ट करताना या १४० अक्षरांवरही मर्यादा आली. २४ ते ३० अक्षरे कमी होऊन फक्त ११०-१२० अक्षरांत व्यक्त व्हावे लागत होते. मात्र आजपासून ‘टिवटिवाट’ करताना फोटो किंवा कोणतीही फाइल अपलोड केल्यानंतर अक्षरांची संख्या कमी होणार नाही. ती १४० पर्यंत राहील. या बदलानंतर ट्विटर आगामी काळात टॅगिंग करताना वापरण्यात येणारी अक्षरे, पोल पोस्ट करतानाही संपुर्ण शब्द मर्यादा वापरण्याची सुविधा देणार आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin