Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


आता व्हॉट्सअॅपवरील मेसेज ऐकता येणार


Main News

पिंपरी, दि.१३ (पीसीबी)- लवकरच तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅपवरील मेसेजेस ऐकता येणार आहेत. स्पीक नावाच्या या फीचरची सध्या आयओएस उपकरणावर चाचणी सुरु आहे. आयफोनधारकांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आलेली आहे.

युजरला आलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजवर ‘स्पीक’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर मेसेज ऐकता येईल. त्यावर रिप्लाय, फॉरवर्ड, कॉपी, डीलीट आणि मेसेज असे पर्याय असतील.

प्रारंभी हे फीचर फक्त आयओएसवर उपलब्ध होणार असले, तरी लवकरच ते सर्व फोनवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये स्टिकर्स आणि छायाचित्रांवर लिहिण्याचीही सोय असेल.

व्हॉट्सअॅपचा ग्रुप चॅटिंग अथवा वैयक्तिक चॅटिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. युजर्सची गरज ओळखून नवनवीन सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न व्हॉट्सअॅपकडून सातत्याने केला जातो. यामुळेच या अॅपला मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin