Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


व्हॉट्सअॅपवर आलेल्या फोटोवर करता येणार कलाकारी


Main News

मुंबई, दि. १० (पीसीबी) - व्हॉट्सअॅप लवकरच अपडेट होणार असून लवकरच व्हॉट्सअॅप अपडेट्समध्ये अनेक मजेदार बदल होणार आहेत. आत्तापर्यंत फोटोखाली कॅप्शन पोस्ट करण्याचा पर्याय देणाऱ्या व्हॉट्सअॅपने आता युजरला फोटोवर व्हॉट्सअॅपमध्येच कलाकारी करण्याची संधी देण्याचे ठरवले आहे. 

व्ह़ॉट्सअॅपच्या आगामी २.१६.२६० व्हर्जनमध्ये डुडलिंग (फोटोवर चित्र काढणे), फोटोवरच लिहिणे, फोटोवर मोठे ईमोजी वापरण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. सध्या व्हॉट्सअॅपच्या या बिटा व्हर्जनची चाचणी सुरू आहे. हे नवीन अपडेट्स पुढील काही दिवसांमध्ये सर्वसामान्य युजर्ससाठी उपलब्ध होतील.

नवीन अपडेट्समध्ये इमोजी आणि अक्षरांचे आकार बदलता येणार नाहीत, तरी ते डिलीट करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. मुख्य फोटोवर केलेली कारागिरी डीलीट करायची असल्यास त्यावर टॅप करून ते वरील पर्यायांच्या डावीकडे असणाऱ्या रिसायकल आयकॉनवर नेल्यास ते डीलीट होतात. हे नवीन व्हर्जन अॅण्ड्रॉइड बरोबरच आयस्टोअरवरही येणार आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin