Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


नव्या आयफोनचे ७ ऑक्टोबरला भारतात आगमन


Main News

मुंबई, दि. ८ (पीसीबी) - आयफोन ७, आयफोन ७ प्लस आणि अॅपल वॉच २ यांचे अमेरिकेत लाँचिंग करण्यात आले असले तरी भारतातील अॅपलप्रेमींना या उत्पादनांसाठी आणखी महिनाभर वाट बघावी लागणार आहे. भारतात नवीन आयफोन ७ ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहे.

बुधवारी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अॅपलच्या उत्पादनांचे दिमाखात लाँचिंग करण्यात आले. अमेरिकेत १६ सप्टेंबरपासून आयफोन ७, आयफोन ७ प्लस मिळणार आहे. २८ देशांमध्ये या फोन्ससाठी १३ सप्टेंबरपासून आगाऊ नोंदणीदेखील करता येणार आहे. पण भारतातील अॅपलप्रेमींना या फोन्ससाठी आणखी काही दिवस थांबावे लागणार आहे. महिनाभरानंतर म्हणजेच ७ ऑक्टोबररोजी अॅपलचा फोन भारतीय बाजारपेठेत दाखल होईल. 

आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस हे दोन्ही फोन ३२ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबीमध्ये उपलब्ध असतील. यातीला सुरुवातीचा म्हणजेच १६ जीबीचा आयफोन ७ हा फोन भारतीय बाजारपेठेत ६० हजार रुपयांपर्यंत मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर आयफोन ७ प्लसची किंमत काय असेल हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

विशेष म्हणजे आयफोनचे नवीन फोन्स अमेरिकेपेक्षा जास्त दराने भारतात विकले जाणार आहेत. ३२ जीबीचा आयफोन ७ हे अमेरिकेत ६४९ डॉलर्स (भारतीय चलनानुसार ४३,१००  रुपये) तर आयफोन ७ प्लस हे ७४७ डॉलर्स (भारतीय चलनानुसार ४९, ७०० रुपये) असणार आहे. तर अॅपल वॉच २ ची किंमत ३६९ डॉलर्स (भारतीय चलनानुसार २४,५०० रुपये) या दराने विकले जाणार आहेत. तर भारतात मात्र ३२ जीबीच्या आयफोन ७ साठी तब्बल साठ हजार रुपये (सुमारे ९०२ डॉलर्स) मोजावे लागणार आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin