Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

तंत्रज्ञान


3 जीबी रॅम आणि दमदार बॅटरीसह सॅमसंगचे 3 स्मार्टफोन लॉन्च


Main News

मुंबई, दि. २ (पीसीबी)-  जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आपले तीन नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. यात सॅमसंग गॅलेक्सी A3, A5 आणि A7 या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. सध्या हे स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध नसले तरीही लवकरच ते भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

सॅमसंगने या तीनही स्मार्टफोनना प्रीमियम लूक देण्यासाठी मेटल फ्रेम आणि 3D ग्लासच आवरण दिले आहे. अशाप्रकारचे आवरण मागच्या वर्षी बाजारात आलेल्या गॅलेक्सी S7 आणि S7 एजमध्ये देण्यात आले होते.

सॅमसंगचे हे तीनही स्मार्टफोन ब्लॅक स्काय, गोल्ड सँड आणि पीच क्लाउड या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असतील.

सॅमसंग गॅलेक्सी A3 (2017) चे फीचर्स खालीप्रमाणे आहेत.

ऑपरेटिंग सीस्टिम अँड्रॉईड 6.0, रॅम 2 जीबी, डिस्प्ले 4.7 इंचाचा सुपर एचडी एमोलेड डिस्प्ले, प्रोसेसर 1.6 GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर, मेमरी 16 जीबी, बॅटरी 2350 mAh, कॅमेरा रिअर 13 मेगापिक्सेल आणि फ्रंट 8 मेगापिक्सेल, सॅमसंग गॅलेक्सी A (2017) चे फीचर्, ऑपरेटिंग सीस्टिम अँड्रॉईड 6.0, रॅम 3 जीबी, डिस्प्ले 5.2

इंचाचा सुपर एचडी एमोलेड डिस्प्ल, प्रोसेसर 1.9 GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर, मेमरी 32 जीबी, बॅटरी 3000 mAh, कॅमेरा रिअर 16 मेगापिक्सेल आणि फ्रंट 8 मेगापिक्सेल, सॅमसंग गॅलेक्सी A7 (2017) चे फीचर्स, ऑपरेटिंग सीस्टिम अँड्रॉईड 6.0, रॅम 3 जीबी, डिस्प्ले 5.5.

इंचाचा सुपर एचडी एमोलेड डिस्प्ले, प्रोसेसर 1.9 GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर, मेमरी 32 जीबी, बॅटरी 3300 mAh, कॅमेरा रिअर 13 मेगापिक्सेल आणि फ्रंट 5 मेगापिक्सेल आदी  उपलब्ध असणार आहेत.

या तीनही स्मार्टफोनमध्ये NFC, ब्ल्यूटूथ, वायफाय, तसंच फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin