Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -संपादकीय


वेळ स्वैराचाराला आवर घालण्याची !


Main News <

देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा होत असतानाच सहाजिकच सगळ्यांना राष्ट्रभक्तीचा उमाळा येईल. वॉटसअॅप, फेसबुकच्या प्रोफाईल फोटो पासून सर्वत्र देशप्रेमाचा जागर होईल. देशभक्तीपर गीते, चित्रपट, कार्यक्रमांचा भडीमार होईल. स्वातंत्र्य दिनाचा आनंदोत्सव झालाच पाहिजे. मात्र, स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वत्र सुरु असलेला स्वैराचार देशहिताला बाधा आणणारा आहे. भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले. ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून भारतीयांची मुक्तता कशी झाली हे सर्वजण शालेय जीवनातच अभ्यासतात. मात्र. ते केवळ परिक्षेत पास होण्यापुरतेच असते की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्या मागचे बलिदान, हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठीचे मापदंड हे आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाखाली उलथवून टाकले जात आहेत. 

'टीआरपी'च्या मागे लागलेली प्रसिध्दी माध्यमे, प्रसिध्दीच्या झोतात राहण्यासाठी बेताल व्यक्तव्य करणारे सेलिब्रेटी, चर्चेत राहण्यासाठी मानवाधिकाराचा कळवळा दाखविणारे तथाकथित समाजसेवक असो अथवा फेसबुकपेजवर 'कमेंटस्‌' आणि 'लाईक्स' मिळविण्यासाठी देशाच्या विरोधात गरळ ओकणारे, प्रसंगी दहशतवादी कृत्यांचे समर्थन करणारे 'नेटीझन्स' यांच्याकडून स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्रास व्याभीचार सुरु आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. इसीस सारखी अनेक मोठ्या देशांवर, शहरांवर ताबा मिळवत आहे. भारताच्या हद्दीत काश्मिरमध्येही इसीसचे झेंडे फडकविले जातात, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात या बाबींकडेही देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून पाहिले जात असेल तर भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या परकीयांच्या आक्रमणाला आवताण देण्यासारखेच ठरेल, असे म्हटल्यास आश्चर्य वाटू नये.  

देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी अनेकांचे बलिदान गेले. मात्र, आयते मिळालेले हे स्वातंत्र्य आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धोक्यात आणत असू तर ते देश विघातकच म्हणायला हवे. एखाद्या दहशतवाद्याला फासावर लटकविल्यानंतर त्याचे समर्थन करणारे नेटीझन्स राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक, नैतिकदृष्ट्या अग्रक्रमाचे विषय मांडताना कधीच दिसत नाहीत. माणूस म्हणून आणि देशवासी म्हणून केवढे अध:पतन आहे ? सत्तेतील मंडळीच लांड्यालबाड्या, चोर्‍याचपाट्या, लूट, लुबाडणूक, अडवणूक, फसवणूक करू पाहतात, हे किती धक्कादायक आहे? स्वातंत्र्याचा अर्थ 'स्वैराचार' आणि लोकशाहीचा अर्थ 'मनमानी' असा  होऊ लागला हे मात्र, चिंताजनक आहे. 

भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सुरु असलेल्या स्वैराचाराचा फार मोठा धोका आहे. देशावर अतिक्रमण करु पाहणाऱ्या परदेशियांशी लढणे सोपे आहे. परंतु, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशाला बालंट लावू पाहणाऱ्या, सोशल मिडियावर देशाची बदनामी करणाऱ्या स्वकियांना आवर कसा घालणार याविषयीचा विचार स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने व्हायला हवा. सोशल मिडियाचा वापर करताना, देशांतर्गत धोरणात्मक निर्णयांवर 'ऑनलाईन' चर्चा घडविताना देशाची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी प्रत्येक देशप्रेमीने घ्यायला हवी. ! 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin