Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -संपादकीय


बेडूक... बैल अन्‌ बारणे !


Main News <

बैल आणि बेडूक यांची गोष्ट सगळ्यांनीच ऐकली असेल. तसाच काहीचा केविलवाणा प्रयत्न शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाटे'त  खासदारकीची 'लॉटरी' लागलेले बारणे आता चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करु लागले आहेत. काम कमी आणि समारंभांना मिरवत प्रसिध्दी मिळविण्याची खासदारांना भारी हौस आहे. ही हौस कमी पडते म्हणून की काय, अधून-मधून ते आपली कार्यक्षमता लपविण्यासाठी अडलेल्या कामांना सत्ताधारी भाजपला जबाबदार धरत असतात. लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. पण किमान आपण कोणाबद्दल आणि काय बोलतोय याचे भान असायला हवे. बैलाची बरोबरी करण्याच्या नादात बेडूक फुगण्याचा प्रयत्न करतो अन्‌ फुटतो. 

बेडूक आणि बारणे यांचे नाते काही जुनेच आहे. सत्तेसाठी त्यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत बेडूक उडी घेतली. २००७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत बारणे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. तथापि, विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते शिवसेनेत गेले. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याकडून ते पराभूत झाले. लोकसभेला बारणे यांनी जगताप यांच्याकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढले. या विजयामुळे बारणे यांचा पुन्हा बेडूक झाला. त्यामुळे त्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये मिसळणेच कमी केले. शिवसेनेचे दुसरे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यावरही प्रसिध्दीसाठी कुरघोडीचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरातील एकाच प्रश्नावर शिवसेनेच्या दोन्ही खासदारांची स्वतंत्र दोन प्रसिध्दीपत्रक माध्यमांकडे येऊ लागली. पक्षात शहर पातळीवर आपल्याला विचारुनच झाले पाहिजे, असा त्यांचा होरा असतो.  स्वतःची कामे मार्गी लावण्यासाठी बारणे यांची राष्ट्रवादीशी असलेली सलगी शिवसैनिकांना रुचत नाही. स्वतःच्याच समर्थकांना पदे वाटणे मात्र, पक्षवाढीकडे दुर्लक्ष या त्यांच्या कार्यपध्दतीला निष्ठावान शिवसैनिक कंटाळले आहेत. 

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न कळीचा ठरला होता. आपणच हा प्रश्न सोडवू, असे सांगताना बारणे यांचा वारंवार बेडूक झाला. हा प्रश्न आजही कायम आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार आपण मूळासह उखडून टाकू, अशी वल्गना बारणे यांनी केली होती. खासदारकी मिळाल्यानंतरही नगरसेवकपद सोडण्याचा मोह बारणे यांना आवरला नाही. त्यातच सगळे आले. रेडझोन, एच. ए. कामगारांचे वेतन, प्राधिकरण तसेच जेएनपीटीतील बाधित शेतकऱ्यांच्या साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न, मावळात पर्यटन विकास आदी अनेक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन बारणे यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र, खासदारकीला पावणे दोन वर्षे होत आली तरी यापैकी एकही महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यात बारणे यांना यश आले नाही. आपल्या निष्क्रीयतेचे खापर मुख्यमंत्र्यांवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. भाजप शहर सरचिटणीस प्रमोद निसळ यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चिडलेल्या बारणे यांनी आठ-दहा कार्यकर्त्यांमार्फत निसळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा बालिशपणा केला. हीच तत्परता बारणे यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी केली असती तर आज अख्खे शहर त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले असते. आज नागरिक जागरुक झाले आहेत. त्यामुळे तोंडपाटीलकी करण्यापेक्षा कामे मार्गी लावण्यावर लोकप्रतिनिधींनी भर द्यायला हवा. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin