Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -संपादकीय


आशाताई असा उद्दामपणा बरा नव्हे !


Main News <

पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित  ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्याऐवजी नाट्यमय घडामोडींमुळे चांगलेच गाजले. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधान करत संमेलनाची 'नांदी' केली. त्यानंतर मग संमेलनाध्यक्षांच्या प्रतिकृतीची गाढवावरुन धिंड..., पुतळ्याची जाळपोळ..., संमेलन उधळून लावण्याच्या धमक्या..., संमेलनाध्यक्षांची दिलगिरी..., धमकीबहाद्दरांची संमेलन व्यासपीठावर चमकोगिरी..., संमेलन साहित्य मंडळाचे की पी.डी. पाटलांचे असा सारस्वतांना पडलेला प्रश्न असे रंगतदार एक-एक अंक सुरु असताना ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी प्रसिध्दीमाध्यमांच्या चित्रिकरणाच्या विरोधात 'राग भैरवी' सादर केला. कोट्यावधी लोकांपर्यंत साहित्य संमेलन पोहचविण्यासाठी धडपड करणाऱ्या प्रसिध्दी माध्यमांचा अपमान करणाऱ्या आशाताईंबरोबरच तथाकथित 'कॉपीराईट' कार्यक्रमाची पूर्व कल्पना न देणाऱ्या संमेलन संयोजकांची किव करावी तेवढी थोडीच आहे. 

देशो-देशीचे सारस्वत, हजारो चाहत्यांसमोर आशा भोसले यांनी आपल्या उद्दामपणाचे दर्शन घडविले. मंगेशकर कुटुंबातील एखाद्या सदस्याने उद्दामपणाचे दर्शन घडविण्याची ही पहिली वेळ नाही. मंगेशकर कुटुंबियांचे संगीत, गायन क्षेत्रातील योगदान कुणीही विसरु शकणार नाही. मात्र, ज्या रसिक प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले, ज्या प्रसिध्दी माध्यमांनी यांना सातासमुद्रापार नेले त्यांच्यापुढे हा उद्दामपणा काय कामाचा ?.  आज अनेक गुणवान कलाकार, तंत्रज्ञ हलाखीचं जीणं जगताहेत. मात्र, मंगेशकर कुटुंबियांची आज पाचही बोटे तुपात आहे ती केवळ त्यांच्या पडत्या काळात प्रसिध्दीमाध्यमांनी त्यांना दिलेल्या उभारीमुळे. गोरगरीब रुग्णांसाठी पुणे महापालिकेने मंगेशकर रुग्णालयाला मोफत भूखंड दिला. रुग्णालयाच्या इमारत उभारणीसाठी मदतनिधीच्या नावाखाली हजारोचे तिकीट दर ठेवण्यात आले होते. वास्तविकता आज, सर्वसामान्य रुग्ण या रुग्णालयाच्या पायरीवरही पाय ठेवू शकत नाहीत. यांचे सामाजिक योगदान आठवताना मेंदूला ताण बसतो. कोल्हापूर जयप्रभा स्टुडिओचा वाद असो अथवा मुंबईतील पेडररोड उड्डाणपुलाचा वाद असो जिथे-तिथे 'आम्ही गाऊ तोच सूर' म्हणजे उद्दामपणाच झाला.  

खरंतरं दिवसभर साहित्य संमेलनाचे चित्रीकरण करुन ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम प्रसिध्दीमाध्यम करत असतात. मात्र, तथाकथित कॉपीराईटचा (स्वामीत्वहक्क) भंग होत असल्याचा आक्षेप घेत आशाताईंना संमेलनातील त्यांच्या संगीत रजनी कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला विरोध केला. तेवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर भर कार्यक्रमातून उठून गेल्या. अहो तुम्ही मोठ्या आहात, तुमचे लाखो चाहते आहेत. त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोहचविण्याची माध्यमांची धडपड सुरु होती. गल्लीबोळातले ऑर्केस्ट्राचे कार्यक्रमाचे चित्रीकरण प्रसिध्दीमाध्यमे करत नाहीत. आणि त्यांनी ठरविले तर गल्लीबोळातला एखादा कलाकार एका रात्रीत 'स्टार' होऊ शकतो, याचा विसर आशाताईंना पडलाच कसा? कलेचा आस्वाद सर्वसामान्यांना घेता आला पाहिजे. तो जर रुचत नसेल तर कॉपीराईटचा धाक दाखविणाऱ्या कलाकारांनी साहित्यसंमेलनासारखे सर्वसामान्य रसिकांचे हक्काचे व्यासपीठ सरळसरळ नाकारावे. तिकीटबारीवर गल्ला जमवून चारभिंतीच्या आड भरणारे खासगी क्लबचे कार्यक्रमच त्यांनी करावेत. आशाताईंना एखाद्या कार्यक्रमाला बोलवायचं झाल्यास त्यांच्या मानधनाचा आकडा ऐकला तर सर्वसामान्यांचे डोळे विस्फारतात. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरही कॉपीराईटच्या आडून त्यांना आपली हाव लपविता आली नाही. त्यातूनच त्यांच्या हातून हा उद्दामपणा घडला. प्रसिध्दीमाध्यमांनी निषेध केल्यावर भर कार्यक्रमातून उठून गेलेल्या आशाताई  काही मिनिटांनी परतल्या झाल्या प्रकाराबद्दल माफी देखील मागितली. माफी मागताना त्यांनी पुन्हा भावनिक डाव रचला. मी ८३ वर्षांची म्हातारी आहे. तुमच्या आजीच्या वयाची आहे, असे सांगत उद्दामपणावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एकमेव, अद्वितीय असाल तर तुमचा हा उद्दामपणाही सहन केला जाईल. मात्र, सामाजिक बांधिलकीची जाण व जमिनीवर असणारे अनेक दिग्गज गायक, संगीतकार, रंगभूमीची सेवा करत आहेत. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्य, साहित्यिक, कलावंतांचा जागर करताना एखाद्या कलाकाराचा असा उद्दामपणा सहन करायचा का याचा विचार साहित्य महामंडळाने करायला हवा. नाहीतर प्रसिध्दी माध्यमचं कायं, सर्वसामान्य देखील साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवतील.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin