Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -संपादकीय


बरं झालं 'दादा' तुम्हीच कान टोचले !


Main News <

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात नाराजी व्यक्त केली. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे याची आठवणही त्यांनी यानिमित्ताने करुन दिली. शहरवासियांना भयमुक्त वातावरणात वावरता आले पाहिजे, असे सांगत राजकीय दबावाला बळी न पडता शहरातील गुन्हेगारी मोडीत काढा, असे आवाहन त्यांनी पोलिसांना केले. बऱ्याच दिवसांनी पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या 'दादां'नी शहरातील कायदा व सुव्यवस्थेची काळजी वाहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

खरेतर शहरातील गुन्हेगारीचा अभ्यास केला तर येथील गुन्हेगारांची नाळ  राजकीय क्षेत्राशी जोडलेली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट देण्यापासून हा खेळ सुरु होतो. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. मनी व मसल पॉवर हा एकमेव निकष उमेदवार निवडीसाठी राष्ट्रवादीकडून ठरविला जातो, असे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते सांगतात. गुन्ह्यांची माहिती लपवत खोटी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर करायची, दहशत माजवत निवडून यायचे हे शहराच्या बहुसंख्य भागातील निवडणूक विजयाचे उघड सूत्र आहे. निवडून येण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्ची करायचा. हा पैसा देखील वाम मार्गाने, खंडण्या वसूल करुन आलेला असतो हे आता लपून राहिलेले नाही. निवडून आल्यानंतर पुन्हा विजयाचा उन्माद साजरा केला जातो. तर पराजय झालेले देखील सर्वसामान्यांवर दहशत माजवत राग काढतात. पुढे हेच गुन्हेगारी वृत्तीचे लोकप्रतिनिधी काखोट्याला बंदुका अडकवून महापालिका सभागृहात जातात. बहुसंख्य नगरसेवकांभोवती सुरक्षा रक्षक म्हणून गुंडांचेच कडे असते. 

राजकीय दबाव झुगारुन कारवाई करा, असे आवाहन अजितदादांनी पोलिसांना केले आहे. मात्र, साधा सिग्नल तोडला म्हणून गाडी अडविली की पुढाऱ्यांचे वाहतूक पोलिसांना फोन येतात. ऐकले नाही की "तुला पाहतो, तुझी बदली करतो", अशी भाषा वापरली जाते. गुन्हेगारांचा बचाव करणे, त्यांची शिक्षा कमी करणे, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास भाग पाडणे यावर काही लोकप्रतिनिधींचा पोलिसांच्या संगनमताने 'उदरनिर्वाह' चालतो. अनेक राजकीय पुढाऱ्यांचे अवैध धंदा हे उत्पन्नाचे साधन आहे. मटका किंग, केबल किंग यांचा भरणा राजकारणात आहे. ेगुन्हेगारी पार्श्वभूमीचे अनेक नगरसेवक महापालिका सभागृहात आहे. त्यांचे पद रद्द करण्याचे प्रस्ताव सभागृहापुढे आणले जातात. मात्र, इतर नगरसेवक कारवाईचा प्रस्ताव तहकूब ठेवत या नगरसेवकांना त्यांची पंचवार्षिक पूर्ण करण्याची मुभा देतात. 

डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष, कामचुकार अधिकाऱ्यांना वठणीवर आणलेल्या आयुक्तांची बदली करण्यात अजित पवार यांचा हात होता. आता हेच 'दादा' पोलिसांकडून कर्तव्यबजाविण्याची अपेक्षा करत आहेत. तुरुंगवास भोगून जामिनावर आलेल्या तत्कालीन काही नगरसेवकांना राष्ट्रवादीने तिकीट देऊन निवडून आणले. दस्तुरखुद्द अजित पवार यांनी त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या. नव्याने निवडून आलेल्यापैकी  राष्ट्रवादी नगरसेवक रोहित काटे यांच्याविरूद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वाकड येथील नगरसेवक विनय ऊर्फ विनायक गायकवाड यांच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. चर्‍होलीतील नगरसेवक नितीन काळजे यांनीही किरकोळ कारणावरून पोलिसांना शिवीगाळ केल्याचा, नगरसेविका सुजाता पालांडे यांच्यावरही महिलेला धमकाविल्याचा गुन्हा आहे. याच गुन्हेगारीतून राष्ट्रवादी नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा बळी गेला. मागीलवेळी सत्ता हातात असतानाही गुन्हेगारी मोडीत न काढू शकणारे अजितदादा आता भाजपच्या नावाने खडे फोडत आहेत. पण काही का होईना 'दादा' गुन्हेगारीवर बोलले हेही नसे थोडके. हिवाळी अधिवेशनातही यावर आवाज उठविणार असल्याचे अजितदादांनी सांगितले आहे. 'दादां'ची ही वाढत्या गुन्हेगारी विरोधातील कळकळ स्वपक्षीय गुन्हेगारांपर्यंत पोहचते का, हे पाहणे शहरवासियांसाठी औत्सुक्याचे आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin