Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


साप्ताहिक राशीभविष्य


Main News

मेष

मेष : आत्मविश्वास वाढेल

जगातील आनंदी माणसांच्या सद्भावनेतून हे जग चालले आहे, त्यांच्या समाधानातून निर्माण होणारी सकारात्मक स्पंदने खूप महत्त्वपूर्ण काम करीत असतात. ग्रहांचे अस्तित्व माणसाच्या मनावर फारच परिणामकारक ठरते नि त्याच्या बरे-वाईट परिणामाची परिणिती शेवटी सुखदु:खाच्या मोजमापात होते. पण दु:खात नि सुखातही तुमची स्थिरता जेव्हा टिकते तेव्हा तुम्ही स्वत:ला समजून घेण्याच्या आसपास जवळ जाता नि या नैसर्गिक क्रियेत निसर्गही तुमच्याजवळ येतो. मंगळ, गुरू, शुक्राचे पंचमातले उत्तम अस्तित्व आपल्या राशीला आनंद देतील. राहू, रवी, बुध, शनी जरी विद्रोहाच्या भूमिकेत वावरले तरी तुमच्या मनावर ते फारसा परिणाम करू शकणार नाहीत. वावरले तरी तुमच्या मनावर ते फारसा परिणाम करू शकणार नाहीत.

दिनांक : ४, , , १० शुभ काळ.

महिलांना : साहित्य कलाक्षेत्रात आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासाचे योग येतील.

 

वृषभ

वृषभ : मनाची सुंदरता जपा

ज्या विचारांची आपण सतत सोबत करीत असतो तेच घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी आपला विचार प्रवाह बदलून सकारात्मकतेकडे वळणे खूप सोयीचे ठरते. पंचमात रवी, बुध, राहू खूप मदतीचा हात देतील. मंगळ, गुरू, शुक्र जरी शत्रू पक्षात असले तरी सप्तमातील शनीबरोबर बुधाचा होणारा शुभयोग उत्तम आकलनशक्ती देईल. त्यातूनच फायद्यातोटय़ाचे अर्थज्ञान उमजेल. वेळ, पैसा, प्रेम यांची सांगड घालण्याचे उत्तम कसब लाभेल. स्वत:ची खरी ओळख तुम्हाला फार मदतीची ठरेल तेव्हा मनाची सुंदरता जाणा. त्यातले विचार फुलासारखे जपा म्हणजे शुभ घडणाऱ्या गोष्टींना उत्तम चालना मिळू शकेल.

दिनांक : ४, , , ७ शुभ काळ.

महिलांना : संशय, अविश्वास यांपासून दूर राहा. बुद्धी स्थिर ठेवा, खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मिथुन

योजना यशस्वी ठरतील

जगात दोन विचारांच्या प्रवाहात माणसे विभागली गेली आहेत. धनात्मक विचार नि दुसरा ऋणात्मक विचार हे दोन्ही प्रवाह अतिशय शक्तिशाली आहेत. सध्या आपल्या राशीभोवती राहू, रवी, बुध नि शनी यांचा नकारात्मक प्रभाव जास्त ताकतीने पुढे सरकत आहे. पण पराक्रमातल्या मंगळ, गुरू, शुक्राच्या स्पंदनातून येणारी सकारात्मकता या प्रवाहाला थोपून धरण्यात यशस्वी ठरेल. गुरू-मंगळाच्या युतीमधून सुचणाऱ्या योजना, कल्पना यशस्वी ठरतील. सत्यप्रियता, समाजसेवा यांतून आपल्या विचारांची महानता लक्षात येईल. आपल्या सात्त्विकतेतून सभोवतालचे आनंद परीघ वाढेल तसेच आठवडय़ातील शुभचंद्र प्रवास समाधान, तृप्तता देईल.

दिनांक : ५, , , ८ शुभ काळ.

महिलांना : उत्तम समयसूचकता लाभेल. मित्र नातेवाईकांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल.

 

कर्क

चांगले चित्र निर्माण होईल

अतिभावुकता हा या राशीचा स्थायीभाव आहे. त्यामुळे यांनी केलेल्या सकारात्मक, नकारात्मक विचारांचा परिणाम यांच्यावर त्वरित होत असतो. तसेच सोबतच्या माणसांविषयी केलेला कुविचार यांचे मन:स्वास्थ्य बिघडू शकतो. यासाठी यांनी केलेला चांगला विचार, चांगले चिंतन खूप मोलाचे ठरेल. जरी या राशीच्या व्ययात मंगळ-गुरू -शुक्र असले तरी यांना यांची आंतरिक स्पंदने फार मोठी साथ देतील. त्यातून निर्माण होणारी सकारात्मकता यांना यशस्वी करील. पराक्रमात राहू, रवी, बुध नि पंचमातील शनी या आठवडय़ात यांच्यासाठी खूप चांगले चित्र निर्माण करतील. तर या जीवन प्रवासात शुभचंद्राची साथ फार मोलाची ठरेल.

दिनांक : ८, , १० शुभ काळ.

महिलांना : अतिविश्वास टाळा, महत्त्वाच्या कामाची निवड करून त्याच्यामागे लागा. आत्मविश्वास वाढेल.

 

सिंह

विचारसूत्र बदला

स्वराशीत मंगळ-गुरू-शुक्र द्वितीयात राहू-बुध ग्रहांचे उत्तम सौख्य लाभेल. पण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतून आपण खूपशा चुकीच्या गोष्टींना मनात जन्म देत असतो. त्यातून निर्माण होणारे परिणाम सुखदु:खाच्या स्वरूपात अनुभवयास मिळतात. सभोवतालच्या कोणतीही गोष्ट आपण आपल्या मनावर कशी ठसवतो यावर आपल्या मन:स्थितीची अवस्था अवलंबून असते त्यात ग्रहांच्या सहवासाची भर पडून ती घटना अधिक संवेदनशील होते. आपले मन लहान मुलासारखे असते. नको करूम्हणणाऱ्या क्रियेकडे आपण जास्त ओढले जातो व त्यातून नकारात्मकतेकडे वळतो तेव्हा त्याला पायबंद घालायचा असेल तर विचारसूत्र बदला. खूप चांगला अनुभव येईल.

दिनांक : ४, , १० शुभ काळ.

महिलांना : कौटुंबिक मतभेद टाळा. नातेवाईक मित्रमैत्रिणीचा सहवास आनंद देईल. प्रवासाचे योग.

 

कन्या

दूरदर्शीपणा येईल

स्वराशीत राहू-रवी-बुध पराक्रमात शनी ही ग्रहरचना कन्या राशीला उत्तम पाठबळ देणारी ठरेल. व्ययातील मंगळ, गुरू व शुक्र यांचे कुटिल डावपेच फारसे परिणामकारक ठरणार नाहीत. मात्र चुकीच्या कल्पना, गैरसमज यांतून निर्माण झालेले न्यूनगंड त्वरित बाहेर काढा नि आपल्यातला आत्मविश्वास अधिक वाढवा. शारीरिक ताकतीपेक्षा मनाची क्षमता अधिक यशस्वी करते तेव्हा विचाराने कामाचे स्वरूप बदला. शरीराचे श्रम गरजेनुसार वापरा. पण शारीरिक ताकतीची परीक्षा घेऊ नका. हर्षल-शनी नवपंचम योगातून येणारा दूरदर्शीपणा, कार्यकुशलता आपल्याला खूप मदतीचा ठरेल. एकूण विचारांची रिमझिम मनाला आल्हाददायक करील.

दिनांक : ४, , , ७ शुभ काळ.

महिलांना : बौद्धिक कामात यश लाभेल. आत्मपरीक्षणातून खूपशा गोष्टींचे आकलन होईल.

 

तूळ

सुवर्णसंधी मिळेल

साडेसाती नि व्ययात रवी-राहू ग्रहणयोग हा योग जरी परिणामकारक असला तरी लाभातील मंगळ, गुरू, शुक्र यांच्या शुभसंकेतातून उत्तम आधार लाभेल. खूपशा लहान लहान गोष्टींत आपण आपलं मन बंदिस्त करीत असतो, तसेच राग, लोभ, क्रोध यातून आपलं प्रेम व्यक्त करतो नि मन गुंतवून ठेवतो. मनाचा नि बुद्धीचा समन्वय साधून खूपशा चांगल्या गोष्टींची आपण निर्मिती करू शकाल, पण मनाबरोबर आयुष्यातील अती अमूल्य वेळ वाया घालवू नका, विशेष म्हणजे या साडेसातीतही गुरू-मंगळाच्या प्रेरणेने बरीच सक्रियता दाखवू शकाल. हा आठवडा तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असेल.

दिनांक : ४, , , १०. शुभ काळ.

महिलांना : कलाकौशल्यातून विशेष आनंद लाभेल. मित्र-नातेवाईक यांच्या भेटीगाठीतून आनंद मिळेल.

 

वृश्‍चिक

 सुखसंवाद साधाल

सध्या पितृपंधरवडा चालू आहे. कावळ्याचे महत्त्व या दिवसांत खूप मानले जाते. ‘‘पैल तो गे काऊ कोकताहे। शकुन गे माये सांगतसे। उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाऊ। पाहुणे पंढरीराऊ घरा कै येती।।’’ ज्ञानेश्वर माऊलीने ईश्वर भेटीसाठी कावळ्याकडे निरोप दिला. मनुष्यप्राणी पशु-पक्षी यांच्यातील सुखसंवाद त्यांनी आपल्या शब्दांत मांडला आहे. आपल्या राशीसाठी सांगण्याचे तात्पर्य म्हणजे साडेसातीमध्ये आपले विचार व्यापक ठेवले की मनाला त्रास कमी होतो. दशमातले मंगळ-गुरू-शुक्र नि लाभातले राहू-रवी-बुध आपल्याला व्यापकतेकडे घेऊन जातील आणि आठवडय़ाचा प्रवास पुढे सरकेल.

दिनांक : ६ ते ९ शुभ काळ.

महिलांना : संसारात समजुतीचे धोरण फायदेशीर ठरेल. परिश्रमाचे सार्थक होईल.


धनु

नवी दिशा लाभेल

साडेसातीचा त्रास जरी असला तरी दशमातले मंगळ-गुरू-शुक्र नि लाभातले रवी-बुध-राहू वातावरणात वेगळे चैतन्य निर्माण करतील. मात्र हा आनंद मनात जपा त्याचा कैफ डोक्यात जाऊ देऊ नका. सुख-दु:खातही जेव्हा स्थिरता प्राप्त होते तेव्हा आपण सद्भावाच्या जवळपास पोहोचतो. या आठवडय़ातील चंद्र प्रवास जरी संमिश्र स्वरूपाचा असला तरी बुध-शनी त्रिएकादश योगातून नवीन दृष्टिकोन प्राप्त होईल. त्यातून सुचणारे विचार तुम्हाला उत्कर्षांची नवीन दिशा देतील. साडेसातीत श्रीमारुती उपासना फलदायक ठरेल. बाकी हा आठवडा तुम्हाला आत्मविश्वास व निर्भयता देईल.

दिनांक : ४, , , १० शुभ काळ.

महिलांना : आध्यात्मिक कामात आनंद लाभेल. प्रवासाचे योग येतील. आरोग्याची काळजी घ्या.

 

मकर

आलेख उंचावत जाईल

आपल्या राशीत अष्टमात मंगळ-गुरू-शुक्र अशा अडचणींच्या पाऊल वाटेवर यशच आपल्याला शोधत असते. या वेळी स्थिर मनाने त्याच्या जवळ जावे. विशेषत: भाग्यात असलेले राहू-रवी-बुध आपल्या बौद्धिक पराक्रमातून तुमच्या समस्या दूर करतील. काळजी, हुरहुर या मानसिक अवस्थेतून बाहेर पडणे गरजेचे आहे. लाभातील शनी जुन्या नातेवाइकांच्या भेटीगाठीतून आनंद देईल. चंद्र-नेपच्यून शुभ योगातून आठवडय़ाचा आलेख उंचावत जाईल. रवी-शनी त्रिएकादश योगातून बोलण्यात एक नैसर्गिक स्पष्टता, धीर येईल. त्यातून आत्मविश्वास वाढेल नि आठवडय़ातला प्रत्येक दिवस जगण्यातील एक वेगळा आनंद देईल.

दिनांक : ५ व ६ शुभ काळ.

महिलांना : नवीन योजना, नवीन कल्पना मार्गी लागतील.

 

कुंभ

आधार मिळेल

सप्तमात मंगळ, गुरू, शुक्र एक उत्तम आशेचा किरण आपल्याला लाभत आहे. जरी अष्टमात राहू, रवी, बुध असले तरी दशमातला शनी उत्तम सुज्ञता देईल. मात्र खूपशा बाबतीत लहान लहान गोष्टींत होणारे गैरसमज टाळा. खर्चाचे प्रमाण वाढू देऊ नका. शब्द देणे, वचने, आव्हाने देणे टाळा. या काळात जितके समजूतदारपणे वागाल तेवढी संकटे दूर होतील. स्वभावात असणारा हेकट, हट्टीपणावर नियंत्रण ठेवा. स्वराशीतील नेपच्यूनच्या सहवासातून आत्मविश्वास वाढेल. विचार आणि कृती यांमध्ये समन्वय साधा. चंद्राच्या शुभ प्रवासात आपली महत्त्वाची कामे मार्गी लागतील. त्यातून आनंद नि समाधान मिळेल.

दिनांक : ४, , , १० शुभ काळ.

महिलांना : संयम, धीर यांतून समस्या दूर होतील. अती भावनिकता टाळा, धावपळ वाढेल.

 

मीन

आनंदी सूर गवसेल

सप्तमात राहू, रवी, बुध नि भाग्यात शनी यांच्या उत्तम पाठबळावर या आठवडय़ात आपण पुढे जाणार आहात. षष्ठातील गुरू-शुक्राचा जरी उपयोग झाला नाही तरी त्याच्यासोबत असलेला मंगळ तुमच्यासाठी खूप कामाचा ठरेल. गुप्त शत्रूचे कटकारस्थान उधळण्यात मंगळाची खूप चांगली मदत होईल. मात्र लहानपण देगा देवाया तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे खूप बाबतीत संयमाचे धोरण ठेवून दोन पावले मागे या म्हणजे हीच माघार तुमच्या यशाला आकार देईल. कमी बोलणे नि कृतिशीलता यातून आपले मोठेपण सिद्ध कराल. या आठवडय़ात पूर्वजांचे स्मरण असू द्या.

दिनांक : ६, , ८ दुपापर्यंत शुभ काळ.

महिलांना : कुटुंबात गैरसमज नकोत, फार टोकाचे निर्णय टाळा, आरोग्य सांभाळा.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin