Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


या आठवड्याचे जाणून घ्या राशीभविष्य!


Main News

मेष - सप्ताहात अनेक गोष्टी मनासारख्या घडणार आहेत. सप्ताहातले ग्रहमान आपल्याला अनेक गोष्टीत मदत करणार आहेत. नियोजन सप्ताहाचे अति महत्त्वाची गरज ठरेल. आर्थिक व्यवहार मनासारखे होतील. व्यापारी आपापल्या क्षेत्रात चमकतील. राजकीय क्षेत्रात पुढाकार मिळेल. अनेक आघाड्यावर आपली मोहर उठवता येईल. सुयोग्य नियोजनातून या गोष्टींना चार चाँद लागतील. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही अनेक गोष्टी मनासारख्या होतील. आरोग्याच्या बाबतीत मात्र कोणताही धोका पत्करू नका.

वृषभ - नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात आपल्याला अनेकांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मनासारखी होत राहील. चांगले किंवा वाईट याचा सुयोग्य निवाडा करणे आपल्या हाती असेल, त्यात मात्र चूक होऊ देऊ नका. सप्ताहात एखादे पाऊल घसरण्याची शक्यता आहे. नको ते व्यसन, प्रलोभन मोठा अनर्थ घडवू शकते. ही गोष्ट सांभाळल्यास आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यक्षेत्रात आपले नाव मोठे करता येईल. साहित्य, लेखन, काव्यस्पर्धा तसेच तत्सम क्षेत्रात वाहवा होईल. 

मिथुन - सप्ताहातली शुक्र नेपच्युन युती आपल्याला नको त्या व्यक्तींच्या समोर आणून ठेवणे शक्य. भाग्यस्थानातले ग्रहमान आपल्याला अनुकूलतेकडे ओढून नेतील. आपले काम नेटाने पुढे न्या. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, तरच आपल्याला अपेक्षित असे यश समोर येईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही अनेक घटना आनंददायी ठरणार आहे. मकरसंक्रांतीचा तिळगूळ खऱ्या अर्थाने गोड होणार आहे. मुलांच्या दृष्टीने विवाहासारखी एखादी शुभवार्ता कानी येईल.

कर्क - नको त्या ओढीने भलत्याच प्रसंगात आपण गुंतले जाण्याची शक्यता आहे. खरे कोण आणि खोटे कोण याचा मुलाहिजा वेळीच जमला पाहिजे. समोरच्याचे मन ओळखतच नोकरी व्यवसायात लक्ष घाला, प्रेमप्रकरणाला स्थगिती द्या. नको तिकडे वेळ जाणार नाही असे पाहा. आर्थिकस्तरावर सध्या खरे तर मोठय़ा घडामोडी घडणार आहेत. अनुकूलतेचा उच्चांक गाठला जाणार आहे. वैवाहिक जीवनातही गैरसमजांचे वादळ वेळीच थोपवल्यास सप्ताह मोठा आनंददायी ठरू शकतो.

सिंह - आपला गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. तरीही आपल्याला स्वकेंद्रापासून केव्हा दूर जायचे आणि स्वकेंद्रात केव्हा यायचे म्हणजेच स्वार्थ आणि परमार्थ कधी साधायचा याचे सूत्र माहीत असणे गरजेचे ठरेल. नोकरी व्यवसाय, स्थावर, कोर्टदरबार, राजकारण इ. अनेक आघाड्यावर आपला स्वतंत्र ठसा उमटवता येईल. कर्जाचा बोजा कमी होईल. वैवाहिक जोडीदाराचा सहभाग आनंददायी राहील. मकरसंक्रांतीचा हा सप्ताह त्यादृष्टीने शुभ सूचक म्हणावा लागेल.

कन्या - घरातली कामे आणि बाहेरचे व्याप अशा दुहेरी कात्रीत आपण अडकणार आहात. नोकरी व्यवसायात काही बाबतीत संघर्ष, अडचणी आणि अडथळे आहेत. कोण कोणत्या हेतूने समोर आला आहे हे ओळखणे कठीण जाईल. तरीही आपल्याला आपली वाटचाल चालूच ठेवायची आहे. अर्थनियोजन अचूक हवे. आर्थिकदृष्ट्या सप्ताह पूर्ण अनुकूल आहे अशी अपेक्षा करू नका. कुटुंबाच्या दृष्टीने काही शुभ वर्तमान ऐकायला मिळेल. 

तूळ - पार्टी, मेजवानी आणि मित्रपरिवार या कोंडाळ्यातून बाहेर पडणे अवघड जाणार आहे. मनोरंजनाला दिलेले प्राधान्य आणि मित्रपरिवाराचे सोडवत असलेले प्रश्न यातून आपल्या स्वत:च्या कामाकडे दुर्लक्ष होणे शक्य. आपले कार्य हेही तितकेच महत्त्वाचे असते हे विसरू नका. नोकरी व्यवसायामधे प्राधान्यक्रम ठरवून कामाला लागा. वैवाहिक जोडीदाराला मिळणारे एखादे यश आपल्या आनंदात भर पाडील. कामामध्ये येत असलेली सफलताही आपल्याला विशेष आनंदित करील. 

वृश्‍चिक - आतापर्यंत जे झाले ते झाले. इथून पुढे आपल्याला अनेक गोष्टीतले यश खेचून आणायचे आहे. बांधकाम, शेती, दुभदुभते, वाहतूक इ. क्षेत्रातील लोकांना हा सप्ताह चांगले दान देणारा ठरेल. साडेसातीचा मध्य संपत आला असताना अनुकूलतेचा उजेड समोर दिसू लागेल. वाढती आवक आत्मविश्वास वाढवेल. मिळणारे सहकार्य आणि नवा मित्रपरिवार यातून आपला उत्साह वाढता राहील. समोरून येणारे काही व्यावसायिक प्रस्ताव विचाराधीन ठेवा. 

धनु - सप्ताहातले वर्गोत्तम रवी गुरू आणि तृतीय स्थानातले ग्रह ही आपली बलस्थाने आहेत. एखादी गोष्ट ठरवा. नियोजन करा. साहित्याची जमवाजमव करा आणि योग्य त्या अनेक व्यक्तींना घेऊन कामाला लागा. दळणवळणाशी संबंधित, वाहतूक व्यावसायिक तसेच पोस्ट, बँक इ. क्षेत्रातील लोकांना एकादे मोठे शुभवर्तमान मिळेल.  वैवाहिक जोडीदाराचेही सहकार्य आपल्या कार्यात चांगली भर घालणारे ठरेल. 

मकर - मकरसंक्रांतीचा हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचा ठरेल. कुटुंबात होणारे शुभकार्य किंवा नोकरीसाठी केलेला प्रयत्न यातून यश मिळेल. त्याच वेळी नोकरी व्यवसायात काही अडचणींचा सामना करावा लागेल. आर्थिकदृष्टय़ा अपेक्षित असा कार्यभाग साधला गेला नाही तरी निराश होण्याची गरज नाही. साडेसाती सुरू होणार म्हणून फार घाबरण्याचे कारण नाही.  वैवाहिक जोडीदाराच्या भावनिक प्रश्नांची वेळीच दखल घ्या. सासुरवाडीचा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज व्हा.

कुंभ - सप्ताहातली ग्रहस्थिती आपल्याला अनेक अंगांनी अनुकूल असली तरी भरकटणारे मन आणि सतत बदलणारे विचार याचाही सामना करावा लागेल. खरे तर आपण मुळातून स्थिरबुद्धीचे म्हणून परिचित आहात. आर्थिक, सामाजिक, राजकीय व कौटुंबिक अशा आघाड्यावर आपणास चांगले यश मिळेल. त्याचा फायदा घेण्यासाठी मानसिकता स्थिर ठेवा, हेच तेवढे महत्त्वाचे. घरातील संततीला एखादा मिळणारा सन्मान, शैक्षणिक यश किंवा क्रीडा प्रकारातले पदक यातून कौटुंबिक उत्साह वाढेल.

मीन - आकृष्ट करणारी, प्रलोभन दाखवणारी किंवा भूलथापांनी आपले मन वळवणारी मंडळी अनेकदा दिसतील. कुठेही अपरिहार्यता येऊ न देणे हे सप्ताहातले परम कर्तव्य ठरावे. वास्तविक कुटुंबीय, वैवाहिक जोडीदार आणि काही जिवलग मित्र यांची चांगली मदत होईल. नोकरी व्यवसायात घडणाऱ्या काही शुभ घटनांनी उल्हसित व्हाल. अर्थ आघाडी मजबूत करता येईल. नवपरिणीतांना अपेक्षित अशी गोड चाहूल लागेल. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin