Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


या आठवड्याचे जाणून घ्या राशीभविष्य!


Main News

मेष - राजकारणातील सत्ताकेंद्र जवळ येऊ शकेल. नोकरी-व्यवसायातील वरिष्ठांचा सहवास आणि आशीर्वाद मिळेल. कामाच्या दृष्टीने बरीचशी अनुकूलता मिळेल. मात्र चुका होऊ द्यायच्या नाहीत. कामातला उत्साह टिकवण्यासाठी वरिष्ठांचा आदर्श कायम ठेवा. सवयींवर आणि व्यसनांवर शक्यतो लगाम ठेवणे आपल्याच हिताचे ठरणार आहे. व्यावसायिकांना सध्याची स्थिती अंतिम निर्णय घेण्यासारखी नसेल. वैवाहिक जीवनात काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरी फार बाऊ करू नका.

वृषभ - विरोधकांकडूनही आपण फायदा लाटू शकाल. आर्थिक स्तरावर अपेक्षित असा टप्पा गाठता येईल. उधारी वसुलीतून चलन खेळते राहील. तसा आग्रहही धरू नका. वैद्यकीय सल्ला चुकूनही डावलू नका. वरिष्ठांशी वाद घालू नका. सरकारी पातळीवर नियमांच्या चौकटीत राहूनच कार्य करा. जास्त हाव धरली तर कुठे जाल कळणार नाही. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही काही अनपेक्षित प्रसंग येणे शक्य. 

मिथुन - स्वत:च्या हिमतीवर सगळी कामे रेटून न्याल अशी शक्यता कमी आहे. कोणाची ना कोणाची मदत घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे कोणालाही न दुखवता आपली कामाची पद्धत आखा. नवे कोणतेही प्रयोग सध्या परवडणारे नाहीत. कोर्टातली वा सरकारी कामे मोठा धोका पत्करून बाजूला करायचे टाळा. घरातील ज्येष्ठांना मिळणारा सन्मान हा आपल्याही कौतुकाचा विषय ठरेल. स्थावरच्या दृष्टीने होत असलेल्या अनुकूल हालचाली आपल्याला सुखावतील. 

कर्क - आपले आध्यात्मिक बळ आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद याच्या साहाय्याने अनेक अरिष्टांवर आपण नक्की मात करू शकाल. मंगळवार, बुधवार व गुरुवारी कोणतेही मोठे निर्णय घेणे शक्यतो टाळा. व्यावसायिक व व्यापारी क्षेत्रात गोंधळाचे वातावरण असेल. कोणत्याही गोष्टीची झटपट पूर्णतेची अपेक्षा करणे हे परवडणारे नाही. नोकरदारांनीही नियमाच्या चौकटीत राहणे गरजेचे ठरेल. मुलांच्या व स्वत:च्याही मित्रपरिवाला पुन्हा पुन्हा तपासणे हिताचे ठरेल. एखाद्या कुसंगतीचा फटका बसणे सहज शक्य आहे. 

सिंह - जोडीदार, मित्रपरिवार, कुटुंबीय, ज्येष्ठ अशा अनेकांचे सहकार्य आपल्याला मिळणार आहे. भागीदारीमध्ये काही मतभेद असले तरी कामे होत राहतील. क्रीडा, शिक्षण, साहित्य आणि राजकारण या क्षेत्रात असणाऱ्यांना सप्ताह एखादा सन्मान देईल. व्यसन, प्रलोभन किंवा कुसंगती यापासून मात्र दूर राहणेच हिताचे ठरेल. उत्साहाच्या वा आनंदाच्या भरात कायदा हातात घेतला जाणार नाही याचीही काळजी घ्या. मुलांच्या दृष्टीने एखादी माहिती आनंददायी ठरेल.

कन्या - आपले वाचन चौफेर असल्याने कल्पनाही अशाच अतिरंजित असू शकतात. कोणत्याही अभासी जगात वावरणार नाही याची काळजी घ्या. कुणी खुशमस्करी जवळ आले तर वाहवत जाऊ नका. आवक पाहण्यापेक्षा खर्चावर नियंत्रण आणणे व तोटा होऊ न देणे हे सप्ताहात जास्त महत्त्वाचे ठरेल. वास्तुविषयक एखादा व्यवहार पूर्ण झालाच पाहिजे असा अट्टहास करू नका. त्यात काही गुंतागुंत होऊ शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा सल्ला हा आपल्यासाठी महत्त्वाचा ठरेल. 

तूळ - मंगळ-नेपच्युनचा शुभ योग आणि अन्य ग्रहस्थिती आपल्याला बऱ्याच बाबतीत अनुकूल ठरेल. सरकारी नियमांचे केलेले पालन, कोर्टदरबारी केलेली तडजोड, नोकरी-व्यवसायात योग्य ठिकाणी घेतलेला पुढाकार आणि कुटुंबामधे आवश्यक त्या केलेल्या सोई-सुविधा यांचा एकत्रित परिणाम आपल्या प्रगतीसाठी मोठा पोषक ठरणार आहे. घरी वाचलेला वेळ सत्कारणी लावण्यासाठी स्वत:ला कामात गुंतवून घ्या. कुठेही पाय घसरणार नाही असे पाहा. वैवाहिक जीवनातही चांगले खेळीमेळीचे वातावरण असेल. 

वृश्‍चिक - कुठूनही थेट फायद्याचे लक्षण नसले तरी अनुकूलतेच्या वाटा दिसतील. मार्ग सापडेल. फायद्याचे प्रमाण वाढणारे नसले तरी खर्चावर नियंत्रण येईल. कुसंगती, व्यसने, प्रलोभने किंवा भलत्याच अनिष्ट अशा गोष्टींच्या नादी लागून साडेसातीचा त्रास वाढणार नाही याची काळजी घ्या. कुठेही सामाजिक प्रथा ओलांडू नका. मित्रपरिवार पुन्हा पुन्हा तपासा. मुलांच्या विवाहविषयक बैठका किंवा स्वत:च्या बाबतीत काही चांगल्या घटनांची नोंद होऊ शकते. 

धनु - एकंदर ग्रहमान आपल्याला प्रगतीच्या एखाद्या मोठय़ा उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी सज्ज आहे. स्वत:ची सकारात्मक भूमिका आणि नकारात्मतेवर केलेली मात याच गोष्टीतून पुढे जाता येईल. राजकीय सत्ताकेंद्रातून मिळणारा प्रतिसाद वेळीच पदरात पाडून घेण्यासाठी तयार राहा. प्रवासातून होणाऱ्या गाठीभेटींचा फायदा उठवा. नोकरी-व्यवसायात येणाऱ्या संधी अचूक टिपा. वैवाहिक जीवनातही चांगल्या घटनांची नोंद कराल. विवाहेच्छूंना अपेक्षित प्रतिसाद मिळेल. मुलांच्या दृष्टीने एखादा चांगला सोहळा पार पाडता येईल. 

मकर - आपल्या खिशाला कात्री लावण्यासाठी, आपल्याकडे आहे ते घेण्यासाठी व गैरफायदा लुटण्यासाठी अनेकजण सज्ज आहेत हे लक्षात ठेवा. कुठेही कोणाच्या कटकारस्थानाला बळी पडणार नाही याची काळजी घ्या. आर्थिकदृष्टय़ा सप्ताह फारसा अनुकूल नाही. मात्र खर्चावर नियंत्रण आणून आपले अपेक्षित गणित जमवणे अवघड नाही. मिळणारी मेजवानी आणि होणारे कार्यक्रम यातून स्वत:ला सावरण्यासाठी तयार राहा. वैवाहिक जोडीदाराची व मुलांचीही मानसिकता सांभाळणे हे जास्त महत्त्वाचे ठरावे.

कुंभ - कोणत्याही मोठय़ा उपक्रमांना लगेचच मंजुरी देणे गरजेचे नाही. पैशाला फुटणाऱ्या अनेक वाटा वेळीच थांबवणे आवश्यक. गैरसमज किंवा वादविवाद यातून काही वेळा मनस्तापही वाटय़ाला येऊ शकतो. नोकरी-व्यवसायात अचानक एखादा बाँबगोळा पडून प्रकरण भलतीकडेच जाणे शक्य. अर्थप्रकरणे अति काळजीपूर्वक हाताळा. वैवाहिक जीवनात काही गैरसमज,  रुसवा-फुगवा झाला तर वेळीच लक्ष देऊन कौटुंबिक शांतता आणि समाधान टिकवणे आपल्या हातात नक्की असेल. 

मीन - सध्या अनपेक्षित घटनांचा काळ आहे. एखादी बातमी किंवा स्वत:कडून झालेली एखादी चुकीची कृती अनर्थकारक ठरू शकते. विनानियोजन कोणतेही काम करू नका. नवीन व्यापारासाठी काही प्रस्ताव समोर येतील, त्यासाठी वेळ द्या. वर्षांरंभ साजरा करताना संयमित राहा. एखादी सौम्य अन्न विषबाधा किंवा डोळ्याचे विकार मोठे प्रश्न आणू शकतात. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात मात्र असणारे वातावरण आणि मिळणारा सकारात्मक पाठिंबा यांचा छानसा उपयोग आपल्या व्यावहारिक प्रगतीसाठीसुद्धा  होईल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin