Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष - जे शक्य आहे तेच बोला आणि जे बोलाल ते करण्याचा प्रयत्न करा. वास्तविक परिस्थिती बऱ्याच अंशी अनुकूलतेकडेच आहे. थोडा विलंब असेल मात्र अनेकांचे सहकार्य मिळणार आहे. अभ्यासाची नवी वाटचाल चालू राहील. विद्यार्थीवर्गाला नवे साहस करता येईल. विवाहितांना वैवाहिक जीवनातला आनंद लुटता येईल. नवपरिणितांना अपेक्षित अशी आनंदाची बातमी कानी येईल. शिक्षण, कला आणि क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना वेगळ्या संधी मिळू शकतील. 

वृषभ - नोकरी-व्यवसायातही कामाचा ताण वाढणार आहे. तरीही आपली शक्ती सत्कारणीच लावायची आहे. आर्थिक शक्तीचा उपयोग जास्त काटेकोरपणे करा. चुकीच्या गुंतवणुकीचा फटका आगामी काळात बसू शकतो. शिक्षण, बांधकाम, न्याय, साहित्य, कला, पत्रकारिता इ. क्षेत्रांत असणाऱ्यांना सप्ताहात एखादी मोठी नवी चांगली संधी मिळू शकते.  सरकारी क्षेत्रातील लोकांना झालेल्या चुकांचे परिमार्जन करण्याच्या संधी मिळतील. 

मिथुन - सप्ताहाचे अंदाजपत्रक, वेळापत्रक, आरोग्यतंत्र आणि एकूणच नियोजन यात कोणतीही चूक राहणार नाही याची काळजी घ्या. अपशब्दांचा वापर पूर्णपणे टाळा. त्यातूनच काही शुभ ग्रहयोगांचा परिणाम आपल्याला चांगला मिळेल याचीही खूणगाठ ठेवा. घरातील ज्येष्ठ व व्यावसायातील अनुभवी लोक यांचा आशीर्वाद पाठीशी असेल. साहित्यवर्तुळातून वाहवा होणार आहे. क्रीडाक्षेत्रात असणाऱ्या युवकांना थोडी मानसिक घालमेल झेलावी लागेल. नोकरदारांनी नियमांच्या चाकोरीतूनच काम करणे जास्त हिताचे. 

कर्क - अचूक ठरू शकणारे अंदाज आणि बरोबर ओळखू येणारे लोक यांचाही उपयोग आपण करून घेऊ शकाल. थोरामोठ्यांचा सल्ला फार उपयुक्त ठरेल. त्यांच्या आशीर्वादाची महती आपल्या लक्षात येईल. आर्थिकदृष्ट्या अनेक व्यवहार मोठा फायदा देणारे ठरतील. आनंद लुटण्यासाठी स्वत: आनंदी राहावे लागते याची खात्री आजकाल आपल्याला झाली असेलच. आध्यात्मिक क्षेत्रातील चालू असलेली वाटचाल समाधान देणारी ठरेल. वैवाहिक जीवनातही हास्यकल्लोळ आणि आनंद राहील. 

सिंह - वाढती ऊर्जा आणि वाढती सत्ता यातून आगामी काळातले अनेक प्रकल्प मार्गी लावू शकाल. कामातला उत्साह वाखाणण्यासारखा असेल. अडथळ्यांचे प्रमाण कमी राहील. नोकरी-व्यवसायात मिळणाऱ्या संधींचा व सामाजिक वातावरणाचा फायदा घेण्यासाठी सज्ज व्हा. व्यापाराच्या मिळणाऱ्या नव्या संधी आणि नवे मार्ग यातून प्रगतीच्या मोठ्या संधी पुढे दिसतील. खाण्यापिण्याची पथ्ये सांभाळणे महत्त्वाचे ठरेल. नवीन वास्तूच्या संकल्पना वेग घेतील. वैवाहिक जीवनात सामोपचाराने घेतल्यास शांततेचा आणि समाधानाचा अनुभव घेऊ शकाल.

कन्या - ग्रहांची अनुकूलता आणि नशिबाची साथ यांचा अनुभव आपण घेऊ शकाल.   अर्थातच नियोजनबद्ध राहणे आणि आर्थिक शिस्तीचा अवलंब करणे या दोन गोष्टींची गरज विसरून चालणार नाही. त्वचाविकार किंवा पोटाचे विकार असणाऱ्यांनी मात्र विशेष काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनात एखादा अनपेक्षित प्रसंग समोर येईल. सुरुवातीला धक्कातंत्र असेल, मात्र त्यामागची पाश्र्वभूमी कळल्यानंतर तो आनंदात परावर्तित होईल. नवीन विवाह जुळणी असो किंवा कोणाला आलेली चांगली नोकरीची संधी असो, यातून सप्ताह संस्मरणीय ठरेल.

तूळ - चांगल्या ग्रहांचा उपयोग करून घेत अशुभतेवर मात करता येईल. चुकीच्या प्रस्तावांवर वेळीच विचार करा. गुंतवणूक काळजीपूर्वक करा. खर्चाचे आकडे मर्यादित ठेवा. मुलांच्या वेगळ्या वाटेवरच्या वागण्यांवर लक्ष ठेवा. नोकरी-व्यवसायाच्या आघाडीवर अनेक चांगले प्रसंग समोर येतील. पत्रव्यवहार, प्रवास, भेटीगाठी, चर्चासत्रे, निरनिराळे उपक्रम यातून आपली छबी सुधारत जाईल. कुठेही पाय घसरू देऊ नका. वैवाहिक जीवनात काही मतभेदांचे प्रसंग आले तरी थोडे नमते घ्या. 

वृश्‍चिक - अशुभ काळातला मोठा काळ मागे पडलेला आहे. आपली बुद्धी शाबूत ठेवा. कर्तृत्व गाजवण्यासाठी स्वत:ला सिद्ध करा. कायदेशीर सल्ला सतत हाताशी ठेवा. कुठेही वेडेवाकडे पाऊल पडणार नाही असे पाहा. आर्थिकदृष्ट्या चांगले ग्रहमान आहे. त्याचा उपयोग करून घ्या. मात्र कुठेही गृहीत धरले एक पण झाले भलतेच, असे घडू देऊ नका. मनातले नैराश्य काढून टाका आणि सकारात्मक विचारांनी पुढे चला. वैवाहिक जीवनातही असाच पाठिंबा राहील. त्यातून उत्साह वाढता राहील. मुलांचे त्रासदायक ठरलेले प्रश्न मार्गी लागतील.

धनु - आपली मुळातली सकारात्मकता, कामातला उत्साह, नातेसंबंधांतला एकोपा आणि सामाजिकदृष्ट्या असलेले आपले वजन यातून सप्ताहात अनेक गोष्टींमध्ये आपल्याला हात घालता येईल. आर्थिक प्रगतीच्या संधी समोर येत राहतील. प्रवासात थोडाफार त्रास होईलही, पण मार्ग निघत राहतील. एकूणच शुभ पर्व सुरू होत आहे. अचूक नियोजन, व्यवस्थित केलेली साधनांची जमवाजमव, पुरेसा विचार करून घेतलेला निर्णय आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यांचा छानसा मेळ जमून येणार आहे. वैवाहिक जीवनातही जोडीदाराचे आपल्यावरचे अवलंबित्व वाढणार आहे. 

मकर - नवे नवे तंत्र हाती येईल. केलेले संशोधन फलदायी ठरेल. अनेक बाबतींत हाताळलेली वेगळी वाट चांगलेच यश देऊन जाईल. त्याचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी सिद्ध व्हा. राजकारण थोडेसे त्रासदायक ठरेलही, पण त्यावरही चांगली मात करता येईल. अनारोग्याचेही औषध सापडेल. उधारी-वसुलीचे आकडे समाधानकारक वाढत राहतील. त्यातून आर्थिक संपन्नता आणि नवे उपक्रम यांचा ताळमेळ घालता येईल. वैवाहिक जीवनात शुभ वर्तमान येईल. दूरच्या प्रवासाचे नियोजन मात्र योग्यच करा.

कुंभ -  निवडलेला माणूस, चुकीची वेळ किंवा चुकीचा मार्ग या गोष्टींपासून स्वत:ला वेळीच सावध करून वेगळे केल्यास सप्ताह आपलाच आहे हे विसरू नका. कल्पनेतही नसलेल्या अशा काही प्रसंगांतून मोठी अनुकूलता प्राप्त होणार आहे. बँक प्रकरणातून मिळत असलेली सुविधा पथ्यावर पडेल. सावकारी तगादे कमी होतील. नोकरी-व्यवसायात मिळणारे नवे सहकार्य प्रगतीचे नवे पर्व घेऊन येणारे ठरेल. बेकारांसाठी हा सप्ताह एखादी चांगली संधी देणारा ठरेल. विद्यार्थ्यांना नियोजित अभ्यासातले यश समोर दिसू लागेल. 

मीन - अनुभवी लोकांचा वेळीच झालेला सहवास यांचा उपयोग व्यावहारिक जगातही करता येईल. मन:शांती आणि मनाचा आनंद वाढला तर व्यवहारी जगतातले कर्तृत्वसुद्धा कसे वाढू शकते याचा अनुभव घ्याल. नोकरी-व्यवसायात मिळणाऱ्या नव्या संधी आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा असतील. जुने विकार नव्याने उद्भवल्यास त्याकडे दुर्लक्ष न केलेले बरे. वैवाहिक जोडीदाराचा व्यवहारात मिळणारा सहभाग मोठा उपयुक्त ठरेल. एकमेकांशी गोड बोलून महत्त्वाचे निर्णय घेण्यातच आपला शहाणपणा दडलेला आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin