Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


जाणून घ्या या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष - सप्ताहात काही कामे अडणार आहेत. त्यातून आपला राग व चिडचिड वाढणार आहे. अशा वेळेस सगळ्यांना सांभाळून घेणे हेच महत्त्वाचे ठरते. समोरचा किती पात्रतेचा आहे हा विचार न करता जी काही मदत मिळेल किंवा द्यावी लागेल ती करत चला. जर आपल्या काही गोष्टींचा कोणाला उपयोग होणार असेल तर कोणतीही शहानिशा न करता परतफेडीची अपेक्षा न करता मदत करा. ही एक मोठी वेगळी गुंतवणूक ठरणार आहे. त्यातून आगामी काळातील काही चांगल्या गोष्टींचे बीजारोपण होणार आहे. 

वृषभ - समोर रवी-शनीचा योगही आहेच. आपला कलासक्त मनाला फारसा प्रतिसाद मिळणार नाही. भौतिक जीवनात अपेक्षित घटना घडतीलच याची खात्री देऊ नका. आलेली प्रकरणे निपटण्यावर आणि सरळमार्गी व्यवहारावर भर द्या. बाहेरच काय पण घरातही कोणाला दुषणे देत बसू नका. योग्य ठिकाणी योग्य अशी सन्मान देण्याची पद्धत ठेवा. वैवाहिक जीवनातील तणाव तर वाढतीलच, आरोग्यही बिघडणे शक्य. आर्थिक स्थिती अजूनही मजबुतीकडे वाटचालीची असेल.  

मिथुन - माणसांना तोडू नका. वाढलेली शक्ती व उत्साह वाया जाऊ देऊ नका. कोणता माणूस कधी उपयोगाला येईल ते सांगता येत नाही. ज्येष्ठ, वरिष्ठ, अनुभवी आणि वृद्ध यांना अंतर देऊ नका. त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी मिळू शकणार आहेत. आर्थिक व्यवहारात पाडलेला नवा पायंडा फलदायी ठरेल. नोकरी-व्यवसायातील बसवलेली घडी मजबूत होईल. वैवाहिक जीवनातही सध्या मनासारखे ग्रहमान आहे. नवपरिणीतांना आनंदाच्या बातमीची चाहूल लागेल.

कर्क - व्यवहार सोडू नका. रीतीभाती ओलांडू नका. जगरहाटी सोडून वेगळ्या वाटेवर जाऊ नका. व्यावहारिक जगामध्ये फक्त पैशाला महत्त्व असते हे लक्षात ठेवा. नोकरी-व्यवसायात नियमाप्रमाणे चाला, कुठेही स्वप्नात बघितले तसे करायला जाऊ नका. प्रत्यक्ष वस्तुस्थिती हाती असलेली माहिती आपली कुवत आणि मिळू शकणारे सहकार्य यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे. 

सिंह - आपली कुवत, शक्ती, सामथ्र्य हे दुसऱ्यावर लादण्यासाठी नसून त्यांचा व्यवहारात उपयोग करण्यासाठी आहे हे विसरू नका. विरोध असला तरी शांततेने मार्ग काढा. मुख्य म्हणजे बाहेरील व्यावहारिक जगातील कोणत्याही ताणतणावाचा कुटुंबीयांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. सरकारी अधिकाऱ्यांनी लाचलुचपत किंवा तत्सम घटनाबाह्य़ गोष्टींना बळी पडू नये. आपले काम आणि आपण असे नियमात पुढे चला. 

कन्या - नियमांचा बागूलबुवा न करता पण नियम न ओलांडता ही कसरत करावी लागेल. ज्येष्ठ व वरिष्ठ यांच्या भेटीसाठी मिळणारा वेळ महत्त्वाचा असेल. ती वेळ पुन्हा येणार नाही. सरकारी नोकरदारांनी विशेष काळजी घ्यावी. व्यापारी वर्गाने मोठा धोका पत्करून चालणार नाही. मिळणाऱ्या संधी थेट घेता आल्या नाहीत तरी विचार अवश्य करा. आळस किंवा गप्पाष्टकात वेळ घालवू नका. वैवाहिक जीवनात गोड पाठिंबा राहील. 

तूळ - सप्ताहातली स्थिती अनुकूलतेवर झुकणारी असली तरी अहंकाराचा फणकारा आपल्याला केव्हाही मागे खेचू शकतो. कोणत्या क्षणी समोर आपल्यापेक्षा मोठा माणूस येईल आणि आपली जागा दाखवील हे सांगता येत नाही. आहे त्या गोष्टी जमिनीवर राहून आपल्याला पूर्णतेस नेता येणार आहेत. ज्यांनी ज्यांनी आपल्याला जे जे काही दिले किंवा शिकवले त्याबद्दल कृतज्ञ राहा. भावनिकतेला हात घाला. कुटुंबात एकी ठेवण्याचा आवर्जून प्रयत्न करा.

वृश्‍चिक - ग्रहमान साडेसातीग्रस्त असलेले असल्याने आपल्याला काही वेगळ्या वाटेवर नेऊ शकतात. कोणालाही कमी लेखू नका, दूषणे देऊ नका. सध्या आपली वेळ परीक्षेची आहे हे लक्षात ठेवून पुढे चला. आपले कुटुंबीय व आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारा कोणी आपल्याला या सगळ्यातून नक्की बाहेर काढणारा ठरेल. सप्ताहात आर्थिक स्तरावर चांगली हालचाल होईल. प्रवासातून सज्जन सहवास लाभेल.

धनु - मौल्यवान वस्तू, चेक बुक, डेबिट, क्रेडिट कार्ड्स किंवा तत्सम वस्तू व्यवस्थित काळजी घेऊन ठेवल्यास सप्ताहात अनेक गोष्टींमध्ये आपल्याला अनुकूलता दिसेल. भेटीगाठीतून आपल्या हिताचे काही निर्णय घेऊ शकाल. मात्र कुठेतरी अहंकार जागा होईल. कोणाला दूषणे देणे, नाव ठेवणे किंवा निंदा करणे या गोष्टी होऊ शकतात. आपले श्रेष्ठ म्हणताना दुसऱ्याला कनिष्ठ म्हणण्याची गरज नसते, हे लक्षात ठेवा. 

मकर - अगदी हातातोंडाशी घास यावा आणि कुठेतरी गाडी बिघडावी, अशी स्थिती या सप्ताहात अनुभवायला येऊ शकते. यामागे आपल्याच काही चुका असण्याचा संभव आहे. कधी काळची नाराज माणसे आपल्या संपर्कात येऊ शकतात. नेमके त्यांच्यावाचून आपले अडू शकते. कोणाला शिव्याशाप देऊ नका. आर्थिक स्तरावर समोर मृगजळ असणे शक्य. खात्री करूनच पुढे जा. आध्यात्मिक स्तरावर मोठे समाधान राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या विश्वासाला तडा देऊ नका. 

कुंभ- या सप्ताहात आपल्या चांगल्या विचारांना खतपाणी मिळेल. आपली महती समोरच्याला कळेल. आपल्याबद्दलचा आदर वाढता राहील. मात्र त्यातूनच अहंकार जागृत झाल्याने समोरच्याला कमी लेखायला जाल. यावेळी हे एक सूत्र लक्षात ठेवा. सप्ताहात अर्थविश्व, समाजविश्व, राजकारण, नवीन वाहन, मुलांची प्रगती अशा अनेक क्षेत्रांत मोठ्या प्रगतीचा टप्पा गाठू शकणार आहात. वैवाहिक जीवनात आपल्याला मोठा पाठिंबा मिळेल, मात्र मतभेद कमी ठेवा.

मीन - सप्ताहातले ग्रहमान आपल्यासाठी बऱ्याच अंशी अनुकूल आहे. अपेक्षा एक करावी आणि मिळावे दोन पट स्थिती काही बाबतीत आपण अनुभवू शकाल. नियम पाळून, कोणालाही न दुखावता केलेल्या कष्टाचे फळ गोड मिळेल. जोडीदाराची मिळणारी साथ, वरिष्ठांची खप्पामर्जी आणि वस्तुस्थिती यांचा चांगला ताळमेळ बसेल. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी येतील. नोकरदारांना नव्या चांगल्या नोकरीचे वेध लागतील. मुलांच्या दृष्टीने एखादा वेगळा चांगला निर्णय प्रत्यक्षात आणू शकाल. विवाहेच्छूंना गोड बातमी मिळेल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin