Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


जाणून घ्या या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष- सप्ताहातला रवी शनी योग आपल्याला फार सुधरू देणार नाही. नित्य व्यवहार तसे चालू राहतील. मुलाचा किंवा मित्राचा एखादा प्रश्न किंवा त्यांची एखादी चूक भलतीच भोवणार आहे. सप्ताहातल्या काही चांगल्या गोष्टींचा आनंद घेताना हेही गोष्ट लक्षात घेतल्यास आपल्याला मिळणारा आनंद हा निखळ असेल. मधुमेह, रक्तदाब व त्वचाविकार असेल तर सावध! वैवाहिक व कौटुंबिक जीवनात काही शब्दांमुळे मोठे घोळ होणे शक्य.

वृषभ - या सप्ताहात समोरच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळेलच अशी अपेक्षा करू नका. अतिप्रलोभन दु:खाच्या वाटेने नेतील. कोणतीही अतिआसक्ती अपूर्ण राहिल्यास चिडचिड आणि राग निर्माण करते. आर्थिक प्रकरणे थोडीफार मार्गी लागतील. सरकारी अधिकारी, सरकारी नियम आणि सरकारी देणी हे न टाळलेले बरे. कायदेशीर पूर्तता करताना कोणत्या चुका ठेवू नका. भागीदारीमध्ये समजुतीचे वातावरण ठेवा. नवे प्रस्ताव सध्या स्थगित ठेवणे हिताचे. 

मिथुन - काही मनोरंजनाचे वेगळे मार्ग समोर येतील. त्यातून खर्चाचे प्रमाण वाढणे शक्य. उगाच कोणाला शब्द देऊन अडकवू नका. नोकरी- व्यवसायात लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे. राजकीय सत्ताकेंद्राच्या जवळ जाण्याचा प्रयत्न न केलेला बरा. नोकरदारांना आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणाकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. स्वत:लाच सगळी कामे करावी लागणार आहेत. मुलांच्या नसत्या उद्योगाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.

कर्क - वस्तुस्थितीचा विपर्यास होऊ देऊ नका. भावनेच्या आहारी जाऊन मोठे निर्णय घेऊ नका. भाऊबंदकी किंवा नातेवाईक यांच्यापासून मनस्ताप होण्याच्या शक्यता आहेत. मुलांचे एखादे वागणे असेच त्रासदायक ठरू शकते. कर्क राशीला या गोष्टी सहज जमू शकतात. त्यातूनच आपल्याला प्रगतीची अनेक दारे उघडली जाणार आहेत. प्रेम प्रकरणाचे मार्ग छानशी हिरवळ घेऊन येतील. वैवाहिक जीवनात गोड प्रसंग येतील.

सिंह - खर्चाचे प्रमाण वाढू शकते. अनुकूलता कुठे हरवली की काय अशी स्थिती येणे शक्य. कौतुक होणार नसले तरी अपेक्षित फायदा खिशात टाकता येईल. वास्तुव्यवहार सध्या स्थगित ठेवलेले बरे. घरातील ज्येष्ठांचा एखादा प्रश्न किंवा वडिलांची तब्येत ही गांभीर्याने घेण्याचे विषय ठरतील. रक्तदाब किंवा हृदयविकार असणाऱ्यांनी सावध राहावे. वैवाहिक जीवनात एखाद्या गैरसमजातून सौम्य वादळ उठणे शक्य. प्रेम प्रकरणात सध्या जैसे थे राहिलेले बरे.

कन्या - आपल्या राशीतला गुरू आणि अन्य ग्रहमान हे बऱ्याच अंशी प्रगतिकारक असले तरी प्रवासातून होणारा त्रास, वरिष्ठांचा ऐनवेळी येणारा नकार, व्यवहारात होऊ शकणारी गडबड आणि एखाद्या गैरसमजातून सुरू झालेले मानपानाचे नाट्य यांचा फटका बसणे शक्य आहे. कोणतेही प्रश्न थेट प्रतिष्ठेपर्यंत नेऊ नका, तरच अपेक्षित लाभ पदरात पाडून घेता येतील. वैवाहिक जीवनात काही चांगल्या प्रसंगाचे साक्षीदार व्हाल. जोडीदाराची केलेली थट्टा एखादा अनपेक्षित प्रसंग आणू शकते. 

तूळ - राजकीय सत्ताकेंद्र, व्यसन, मोठी खरेदी व कोणाची प्रेम प्रकरणे यात मोठी सावधगिरी बाळगा. आर्थिकदृष्ट्या लगेच फायदा होणार नसला तरी आगामी काळासाठीची मोठी तरतूद होऊ शकते.भाऊबंदकीच्या त्रासातून किंवा वडिलार्जित इस्टेटीच्या प्रश्नातून मोठा मनस्ताप मात्र वाट्याला येऊ शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे स्वप्नभंग होईल, असे होऊ देऊ नका. मुलांच्या दृष्टीने एखादा विस्मयकारक निर्णय कानावर येईल.

वृश्‍चिक - साडेसातीतला तसा त्रासदायक काळ. विशेषत: ज्येष्ठा नक्षत्रगटांना हा सप्ताह आणखी जास्त विचार करायला हवा. मोठ्या अपेक्षा ठेवू नका. नित्य व्यवहार तेवढे चालू ठेवा. आर्थिकदृष्ट्या नुकसान नसले तरी मोठा फायदा सध्या अपेक्षित नाही. प्रवास किंवा पत्रव्यवहारातून मात्र काही चांगल्या वार्ता कानी येतील. त्यातून उत्साह वाढेल. एखादी साहित्यकृती जन्माला येईल. कला, काव्य यातून प्रसिद्धीची वेगळी वाट समोर येईल.

धनु - या सप्ताहात काही गोष्टी मनाविरुद्ध जाणार आहेत. बँक प्रकरणे, कोर्ट प्रकरणे किंवा सरकारी काम यातून धावपळ वाढणार आहे. अनुकूलता हाती असेलच असे नाही. या सप्ताहात प्रगतीसाठी खूप मोठे पोषक वातावरण आहे. स्वत:च्या ओळखी आणि मिळणारे सहकार्य महत्त्वाचे ठरेल. सरकारी नियमांचे कोणतेही उल्लंघन न केल्यास आपला फायदा आणि यश याचा आनंद घेऊ शकाल. वैवाहिक जीवनातही आनंददायी गोष्टींची नोंद घ्याल.

मकर - विचारपूर्वक, योग्य नियोजन करून, सर्व क्षमतेने आणि योग्य वेळी केलेले काम मोठे फलदायी ठरते याचा अनुभव या सप्ताहात घेणार आहात. एकीकडे आर्थिक व्यवहारात मोठा फायदा दिसत असताना सरकारी नियमांचा अडथळा येणे शक्य. कामाचा कंटाळा करू नका. शब्द योग्य तेच वापरा. कागदपत्रांची योग्य शहानिशा करा. वैवाहिक जीवनातही अशीच मूल्ये जपण्याची गरज आहे. वादविवाद किंवा हिंसात्मक वातावरणातून काहीही हाती लागणार नाही. 

कुंभ - काही व्यावहारिक व व्यावसायिक अपयशाचा मानसिक परिणाम होणे शक्य. मोठे नुकसान नसले तरी व्यवहार पुढे ढकलणे किंवा अपेक्षित येणे न आल्याने होणारे त्रास असू शकतात. त्यातून आपला वैचारिक गोंधळही होणे शक्य. दुसऱ्या कोणाला दोष देण्यापेक्षा आपल्याच चुका शोधाल तर बरेच व्यवहार मार्गी लावता येतील. वैवाहिक जोडीदाराचे काही प्रश्न उद्भवणे शक्य. त्यांना वेळीच साद घालणे हे आपले कर्तव्य ठरावे.

मीन - मनस्ताप वाढला तर निराशा व त्यातून आळस वाढेल. कशाला करायचे ते काम अशी धारणा बनेल. वरिष्ठ किंवा ज्येष्ठ यांची नव्हे तर सहकारी किंवा समवयस्क यांच्याकडून आपल्याला हवी ती मदत मिळेल. आर्थिकदृष्ट्या संपन्नतेकडे वाटचाल करता येईल. नोकरी-व्यवसायात फार वेगळ्या वाटेने जाण्याचा विचार करू नका. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही होणाऱ्या चांगल्या घटनांची सकारात्मक नोंद घ्या.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin