Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


या आठवड्याचे जाणून घ्या राशीभविष्य!


Main News

मेष - आपण जसे ठरवू तसेच होईल अशी अपेक्षा करू नका. मुख्य म्हणजे स्वत:ची तब्येत, आरोग्यसल्ला आणि पथ्यपाणी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे ठरेल. नोकरी-व्यवसायातही काही अडथळ्यांचे प्रमाण वाढणार आहे. कुठेही जोरजबरदस्ती न करता आपली वेळ योग्य नाही हे लक्षात घ्या. सबुरीने वागा. आर्थिक आवक ही किती झाली यापेक्षा कशी आली हेच या सप्ताहात महत्त्वाचे ठरेल. नाही म्हणायला उधारी वसुलीतून काही व्यवहार पूर्णत्वाला जाऊ शकतात. 

वृषभ -  योग्य माणसांना योग्य अंतरावर ठेवून व्यवहार केल्यास सप्ताहात काही कमवता येणार आहे. मुख्य म्हणजे धंद्यातील भागीदार व ग्राहकराजा यांच्याकडे विश्वासाने पाहा. सल्लाकार्य करणाऱ्या किंवा बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा सप्ताह वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा ठरू शकेल. नोकरदारांना नव्या नोकरीची चाहूल लागेल. त्यातून प्रगतीची चिन्हे दिसतील. वैवाहिक जीवनात थोडाफार अबोला असला तरी जोडीदाराचा सल्ला मात्र वेळोवेळी अवश्य लक्षात घ्या.

मिथुन - आपल्याला खूप काही चांगले दिसेल. बऱ्याच जणांच्या बाबतीतली आपली मते अनुकूल असतील, पण परिस्थिती प्रत्यक्षात तशी असणे अवघड आहे. खरे तर नशीब आपल्या बाजूने आहे पण योग्य माणसांची पारख योग्य वेळी केल्यास आपल्याला धोके टाळता येणे शक्य आहे. आर्थिकदृष्टय़ा इच्छापूर्ती होत राहील. नोकरदारांना सध्या खाणे पिणे असो किंवा बोलणे, जिभेवर दोन्ही अर्थानी नियंत्रण ठेवणे गरजेचे ठरेल. वैवाहिक जीवनात चांगला ताळमेळ असेल. 

कर्क - सप्ताहात स्वत:चे किंवा कुटुंबात कोणाचे आरोग्यतंत्र जपणे हे सगळ्यात महत्त्वाचे कार्य ठरणार आहे. किरकोळच बाब असेल, परंतु दुर्लक्ष करून चालणार नाही. मुख्य म्हणजे बाहेरील कोणाकडून घरातल्या कोणाचे मानसिक खच्चीकरण होत असेल तर तिथे खंबीरपणे उभे राहणे आपले कर्तव्य असेल. नोकरी-व्यवसायात या गोष्टींचा त्रास होणे शक्य आहे. कामाचे प्रमाण वाढू शकते. सरकारी देणी आणि सरकारी यंत्रणा याबाबतीत कोणतीही कुचराई करू नका. नोकरदारांनाही सध्या नियमांचा जाच होणे शक्य. 

सिंह - कोणाचा मानसन्मान जपता जपता मन:स्तापाचेही प्रसंग येणार आहेत. बांधकाम व्यावसायिक, फर्निचर, शेती व तत्संबंधी पूरक व्यवसाय करणाऱ्या सगळ्यांना या सप्ताहात काही प्रमाणात सरकारी नियमांचा त्रास होणे शक्य आहे. आपल्याला नोकरी-व्यवसायावर लक्ष ठेवायचे आहे. त्या आघाडीवरही काही चांगले निर्णय होऊ घातलेले आहेत. आर्थिकदृष्टय़ाही एकादी मोठी गुंतवणूक समोर येणे शक्य आहे. सारासार विचार करूनच निर्णय घ्या. 

कन्या - सप्ताहातली सर्वोत्तम राशी असे आपले वर्णन करणे शक्य आहे. कविता, साहित्य, लेखन इ. माध्यमांतून प्रसिद्धी मिळत राहील. आर्थिक आघाडीवर एखादा नवा चांगला पर्याय उभा राहील. केलेल्या अभ्यासाचे फळ मिळेल. भेटणारी माणसे आणि मिळणारा सल्ला यांचा नेमका उपयोग करून घेण्याइतके कौशल्य आपल्याकडे आहेच, ते वापरा. नोकरदारांनाही नव्या चांगल्या नोकरीच्या किंवा बढतीच्या प्रयत्नात यश मिळू शकते. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही काही चांगल्या गोष्टींची नोंद अवश्य करू शकाल.

तूळ - ठरवल्याप्रमाणे सगळे होईल, असे समजू नका. शेअर मार्केट किंवा अशा अस्थिर वातावरणात असणाऱ्यांनी या सप्ताहात फार मोठय़ा अपेक्षा ठेवू नयेत. नोकरदारांना सध्या फक्त बिनचूक काम करणे एवढेच महत्त्वाचे आहे. व्यापारी वर्गाने सध्या नव्या व्यापाराचे प्रस्ताव काही दिवस बाजूला ठेवलेलेच बरे. पारंपरिक व्यवसायात असणाऱ्यांनी भाऊबंदकीला तोंड देताना सबुरीने घेणे हिताचे ठरेल. वैवाहिक जीवनात सध्या काहीसा आराम असेल. कौटुंबिक जीवनात ज्येष्ठांच्या काही वेगळ्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल.

वृश्‍चिक - त्यातल्या त्यात ज्येष्ठा नक्षत्र गटांनी जास्त काळजी घेणे हिताचे ठरेल. आरोग्य, कौटुंबिक समस्या, व्यापारी आघाडीवरील काही प्रश्न किंवा मित्र परिवारातील काही प्रश्न यांची सध्या उत्तरे मिळतील, अशी शक्यता कमीच आहे. केवळ कर्तव्यभावनेतूनच कामे करीत पुढे चला. स्वत:चे आरोग्य किंवा कौटुंबिक सदस्यांचे आरोग्य याची सध्या काळजी घेणे हिताचे ठरेल. आर्थिक आघाडी मात्र बऱ्याच अंशी मनासारखी राहील. 

धनु - एखादी गुंतवणूक चुकीच्या दिशेने होत नाही ना, याची काळजी घेत असतानाच नव्या येणाऱ्या प्रस्तावावर विचार करणेही गरजेचे ठरेल. हितशत्रूंचा फार मोठा धोका नसला तरी व्यसन, प्रलोभन किंवा कुसंगती यांचा एखादा फटका बसू शकतो. नोकरदारांनीही सगळी कामे पारदर्शी ठेवणे त्यांच्या हिताचे ठरेल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात काहीसा दुरावा अनुभवावा लागेल. मुलांचे आपल्या नकळत होत चाललेले काही व्यवहार समोर येणे शक्य.

मकर - सरकारी धोरणांचा एखादा फटका सोडल्यास नोकरी-व्यवसायात मनासारखे व्यवहार घडणार आहेत. आर्थिक स्तर चांगलाच उंचावता येणार आहे. स्वत:चे आरोग्यतंत्र जपत केलेल्या कामांना चांगले यश मिळेल. नोकरदारांना आपल्या कौशल्याची चुणूक दाखवायची संधी मिळेल. नव्या कामाचे तंत्रही चांगले आत्मसात करता येईल. राजकारणात असणाऱ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातील मतभेद शक्य तेवढे बाजूला करा. 

कुंभ - मधुमेह, हृदयविकार किंवा डोक्याचे विकार असणाऱ्यांनी थोडीफार काळजी घेणे या सप्ताहात गरजेचे ठरेल. फार काही गंभीर नसले तरी नोकरी-व्यवसायावर त्याचा परिणाम होऊ शकतो. अन्यथा सप्ताहात आपल्याला अनुकूलतेचा डोंगर दिसणार आहे. आपली शिस्त आणि वेळेच्या मर्यादा या चौकटीत राहूनच या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. नवा भागीदार किंवा नवे ग्राहक यांचा थोडाफार ससेमिरा राहील, पण एकूण परिस्थिती मोठी अनुकूल राहील. प्रवासात हरविणे किंवा छोटेसे अपघात यांचा त्रास होऊ शकतो. 

मीन - सप्ताहातली अनुकूलता आपल्याला आर्थिक आघाडींवर मोठी संपन्नता देणारी ठरू शकते. सध्या घरगुती कामांपेक्षा नोकरी-व्यवसायातील कामांवर जास्त लक्ष द्या. नव्या व्यापाराचे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकाल. सरकारी कामांमध्ये होत असलेली दिरंगाई कदाचित एखादा फटका देऊ शकते. त्याची काळजी करीत बसण्याची गरज नाही. सहकारी, वरिष्ठ आणि आपले कामातील कौशल्य यांचा चांगला मेळ बसेल.  वैवाहिक जोडीदार व कुटुंबीयांची साथही चांगली मिळेल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin