Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


जाणून घ्या या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष - पैशाचे गणित मनासारखे जमत येणार आहे. भागीदार किंवा जवळच्या मित्रांच्या मदतीने काही कामे बिनबोभाट पार पडणार आहे. स्वत:चा एक वेगळा चाहतावर्ग तयार होईल. आर्थिकदृष्टय़ा सप्ताहात अनेक कामे व्यवस्थित मार्गी लागतील. कोर्टदरबारची कामे दुर्लक्षित करून चालणार नाही. तेथे तडजोडीचे तंत्र चांगले उपयुक्त ठरेल. आरोग्य सल्ला तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात काही वेगळे प्रश्न निर्माण झाले तरी एकूण आनंद राहील. मुलांच्या दृष्टीने त्यांच्या शैक्षणिक प्रश्नात एखादी गुंतागुंत वाढणे शक्य.

वृषभ - आपली चुकीची ध्येयधोरणे किंवा चुकीचे विचार यांचा पुन्हा पुन्हा विचार करा. नोकरी-व्यवसायातील वरिष्ठ आपल्याशी केवळ शत्रुत्व करतात अशी भावना मनात ठेवू नका. आपल्याबद्दल होऊ घातलेला गैरसमज वेळीच दूर करण्याचा प्रयत्न केल्यास उधारी वसुलीच्या माध्यमातून अर्थ-आघाडी मजबूत होत राहील. खाण्यापिण्याची बंधने पाळणे आपल्या हिताचे असेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला मिळणारी अन्य कुटुंबीयांची साथ ही आपल्याला थोडाफार मनस्ताप देईल.  

मिथुन - राजकारणात कोणीही कायमचे शत्रू वा मित्र नसतात हा मंत्र आपण आपल्या व्यक्तिगत जीवनात काही दिवस जपणे हिताचे ठरेल. आपल्या एखाद्या चुकलेल्या शब्दाने होत आलेली कामे परत फिरू शकतात. कोणाचाही केलेला उपमर्द नुकसानकारक ठरू शकतो. उधारीवसुलीत जोरजबरदस्ती टाळा. टोकाचे बोलणे टाळा. आरोग्याच्या बाबतीत पथ्यपाणी वेळच्या वेळी सांभाळा. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात सौहार्दपूर्ण वातावरण राहील. 

कर्क - प्रत्येक वेळी मन खट्टू करून रडत बसण्यापेक्षा धीराने प्रत्येक गोष्टीला सामोरे जा. एकीकडे व्यावसायिक बाजू भक्कम होत असताना दुसरीकडे आपल्याच अशा वागण्याने पायावर दगड पाडून घेणार नाही याची काळजी घ्या. काही लोक तुमची थट्टा करण्यासाठी, तर काही लोक तुमचे खच्चीकरण करण्यासाठी तयार आहेत. वैवाहिक जीवनात थोडेफार वादविवाद असतील ते उग्र होणार नाहीत याची काळजी घ्या. मुलांच्या दृष्टीनेही एखादा मोठा खर्चाचा आकडा समोर येणे शक्य.

सिंह - सतत सतर्क राहणे हाच त्यावरील खरा उपाय आहे. आगामी सुमारे महिनाभर आपल्याला फार मोठे निर्णय घेताना पदोपदी विचार करायचा आहे. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठांशी असणारे नातेसंबंध यांचा उपयोग आपल्याला वेळीच होईल असे नाही. कोणत्याही गोष्टी गृहीत धरून पुढे जाऊ नका. मिळेल ते पदरात पाडून घेऊन पुढे चला. वैवाहिक जीवनात काही गैरसमजातून अनपेक्षित प्रसंग येणे शक्य. 

कन्या - भेटीगाठी, पत्रव्यवहार आणि चर्चासत्रे यातून अनेक जटिल प्रश्नांतून सुटका करून घेता येईल. ज्येष्ठ मार्गदर्शक आणि नोकरीतील वरिष्ठ यांच्या माध्यमातून आपली कामे सहजच पूर्ण करून घेता येतील. नव्या व्यवसाय, व्यापारासंबंधी सध्या पुन्हा पुन्हा विचार करणे हिताचे ठरावे. साहित्य वर्तुळात कोणतेही गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. मित्रमंडळी नाराज होणार नाहीत असे बघा. वैवाहिक जीवनातही होऊ घातलेले गैरसमज वेळीच दूर करा. 

तूळ - सप्ताहातले रवीचे आपल्या राशीतले भ्रमण संपून तो वृश्चिकेत जात आहे. कुटुंबीयांचा थोडाफार असहकार किंवा मतभेद यातून पुढे जावे लागेल. बँकप्रकरणे किंवा देण्याघेण्यातले व्यवहार यातून मनस्तापाचे प्रसंग येतील. नोकरी-व्यवसायाच्या माध्यमातून नवे नातेसंबंध जुळत राहतील. पुढील काही वर्षांसाठीचे नियोजन आखता येईल. परंतु काही सरकारी नियमांचा विसर पडल्यास त्यात मोठे धोके संभवतात. 

वृश्‍चिक - सरळमार्गी केलेल्या व्यवहारात कुठे ना कुठे अडथळे येत राहतील. उधारी-वसुलीचे आकडे मात्र वाढते राहतील. खात्रीशीर व्यवहारांवरच भर देणे जास्त हिताचे ठरेल. थांबा, पाहा व मगच पुढे जा हे तंत्र सध्या उपयोगाचे ठरेल. सरकारी अधिकाऱ्यांशी वितुष्ट घेऊ नका. सरकारी देणी वेळेत देणे हेच हिताचे ठरेल. आर्थिकदृष्टय़ा सप्ताह अगदीच वाईट नसला तरी गती थोडीफार संथ होणे शक्य. पण त्यामुळे नियोजनावर फार मोठा परिणाम होईल असे नाही. 

धनु - आपली व्यावसायिक गुपिते किंवा महत्त्वाचे दस्तऐवज यांचा सांभाळ नीट करा. हितशत्रूंना वेळीच ओळखा. आपल्या खुशमस्कऱ्यांच्या माध्यमातून होऊ घातलेली हेरगिरी वेळीच थांबवा. नोकरदारांनाही सध्या अनपेक्षित बदलाचे धक्के बसू शकतात. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या काही शब्दांमुळे तात्कालिक अपेक्षाभंग होणे शक्य. मुलांच्या बाबतीतही काही अनपेक्षित प्रसंग ओढवणे शक्य.

मकर - कोण केव्हा येऊन आपली विकेट घेऊन जाईल हे सांगता येत नाही. ही सतर्कता बाळगल्यास सप्ताहात आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळू शकेल. आर्थिक चुका टाळल्यास त्या आघाडीवरही मोठी रक्कम पदरात पाडून घेऊ शकाल. नोकरदारांना सध्या न आवडीच्या कामात गुंतून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे तिथेही स्वत:ला सिद्ध करणे आपल्याच हिताचे ठरेल. वैवाहिक जीवनात काही मूलभूत प्रश्न निर्माण होणे शक्य. 

कुंभ - सध्या नव्या व्यापाराचे प्रस्ताव अनेक ठिकाणी मिळतील. त्यामध्ये सगळे वातावरण अतिशय सुसंबद्ध आणि मोठे फायदेशीर असे दाखवलेही जाईल. मात्र कोणताही अंतिम निर्णय न घेणेच हिताचे ठरेल. बँक प्रकरणात व सरकारी पातळीवर कोणत्याही चुका होऊ देऊ नका. वैवाहिक जीवनात सध्या पुरेसा ताळमेळ राहील. मुलांच्या आणि कुटुंबाच्या दृष्टिनेही आपली पडणारी पावले ही सुखकारक व हितकारक ठरतील.

मीन - स्वत:च्या अधिकारात आणि स्वत:च्या कक्षेत येणाऱ्या गोष्टींवरच भर द्या.  त्यातून अर्थलाभ वाढता राहील. त्या बाबतीत मात्र सप्ताह मोठी मदत करू शकतो. नोकरदारांनाही मोठय़ा चुका टाळल्यास या सप्ताहात बढतीच्या दिशेने वाटचाल करता येईल. प्रवासातून होणाऱ्या ओळखींचा कदाचित गैरफायदा घेतला जाईल. वैवाहिक जीवनात सध्या जोडीदाराची मिळणारी साथ हा आपला अभिमानाचा विषय ठरेल. मुलांच्या दृष्टीने निर्माण होणारा एखादा प्रश्न हा आपल्याला वेगळा विचार करायला लावणारा ठरेल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin